Headlines

Mumbai Ganesh Visarjan,Ganeshotsav 2026: मुंबईत यंदा 355 कृत्रिम तलाव, गणेशमूर्ती विसर्जनस्थळांची माहिती आता ‘गुगल मॅप’वर – ganeshotsav 2026 more than 355 artificial ponds will be available in mumbai this year


Mumbai Ganeshotsav 2026: मुंबईत २०१२ मध्ये २७ कृत्रिम तलाव होते. २०२२ मध्ये १५४ कृत्रिम तलाव उभारण्यात आले. २०२३ मध्ये हीच संख्या १९१ पर्यंत पोहोचली. तर २०२४ मध्ये २०४ कृत्रिम तलाव उभारले.

Anderson Phillip Catch - 2026-08-30T163622
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. गेल्या वर्षी कृंत्रिम तलावांमध्ये विसर्जनाला मिळालेला प्रतिसाद पाहता गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यंदा ३५५पेक्षा अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध केले जाणार आहेत.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गेल्या वर्षी सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेशमूर्तींबरोबरच एमपीसीबीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यंदाही उच्च न्यायालयाच्या २४ जुलै २०२५ च्या आदेशाचे पालन करणेच बंधनकारक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आगमन-विसर्जनाची जय्यत तयारी सुरू केली आहे.

Maharashtra TimesMaharashtra FDA: एफडीएला पुन्हा चपराक, उच्च न्यायालयाचे तीव्र ताशेरे, दोन प्रकरणांत नामुष्कीगेल्या वर्षी २९८ कृत्रिम तलाव उभारण्यात आले. यंदा ३५५ पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. समुद्र किनाऱ्यांवर विसर्जन होतानाच २३ नैसर्गिक तलावही विसर्जनासाठी उपलब्ध आहेत. कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी सहा फुटांपर्यंतच्या पर्यावरणपूरक ७२ हजार ३६१ मूर्तींचे, तर ६ फुंटापर्यंतच्या १ लाख ११ हजार ६४१ पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले होते. २०२४ मध्ये ४० टक्के, तर २०२५ मध्ये ९८ टक्के या उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले होते.

महापालिकेकडून १ हजार १२७ मूर्तिकारांना ऑनलाइन वन विंडो प्रणालीद्वारे मंडप परवानग्या उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ७६० टन शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. विभागनिहाय एकूण २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग मूर्तिकारांना विनामूल्य वितरित करण्यात आले.

आगमन-विसर्जनाची तयारी

यंदा आगमन व विसर्जन मार्गावरील अडथळा निर्माण करणाऱ्या २८१ ठिकाणच्या केबल्स काढून टाकण्यात आल्या आहेत. तर, एकूण ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे व १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. आगमन-विसर्जन मार्गावरील ४९२ ठिकाणी वृक्षछाटणीही करण्यात आली आहे.

Maharashtra TimesSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान टप्याटप्याने वाहतूक ब्लॉकमहापालिकेकडून सज्जता
सोसायट्यांबरोबरच चौपाट्यांलगतही कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. वाहनांवर फिरत्या कृत्रिम तलावांची सुविधाही उपलब्ध होणार आहे. गणेशभक्तांना प्रभाग स्तरावर गुगल मॅपच्या साह्याने विसर्जनस्थळांची ठिकाणे तसेच विसर्जनासाठी उपलब्ध वेळेच्या स्लॉटची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेशमूर्ती विसर्जनस्थळाची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात येईल.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा