Mumbai Elderly Woman Death in Tardeo after Grandson left to Die Crime News; दारुला पैसे दिले नाहीत, मुंबईकर नातवाची 93 वर्षांच्या आजीला धमकी, लॉक लावून पळाला, वृद्धेचा करुण अंत
Mumbai Elderly Woman Death in Tardeo after Grandson left to Die Crime News; दारुला पैसे दिले नाहीत, मुंबईकर नातवाची 93 वर्षांच्या आजीला धमकी, लॉक लावून पळाला, वृद्धेचा करुण अंत
Mumbai Old Woman Death : हृदयशस्त्रक्रिया झालेल्या वृद्ध आजीला मोठा आवाज सहन होत नसतानाही नातू तिच्यावर खेकसला,धमकी दिली. त्यानंतर घाबरून बेशुद्ध पडलेल्या आजीच्या अंगावरील दागिने घेऊन तो पसार झाला. आजीचा घरातच करुण अंत झाला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ९३ वर्षीय आजीला धमकावून, ती बेशुद्ध पडल्यानंतर तिच्या अंगावरील दागिने काढून नातू पसार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील ताडदेव येथील तुळशीवाडी परिसरात उघडकीस आली आहे. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या वृद्धेला मोठा आवाज सहन होत नसतानाही नातू तिच्यावर खेकसला, गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरून बेशुद्ध पडलेल्या वृद्धेचे अंगावरील दागिने घेऊन तो पसार झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच या आजीचा मृत्यू झाला. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल करून नातवाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
आजीकडे पैशांची मागणी
तुळशीवाडीतील आंबेडकरनगरमधील नवरंग सोसायटीत पालुबेन बाबरिया या मुलगा, सून आणि नातू जिग्नेश यांच्यासह राहत होत्या. जिग्नेशला दारूचे व्यसन असल्याचे पोलिसांनी सांगितले. ८ ऑगस्ट रोजी पालुबेन यांचा मुलगा आणि सून कामावर गेले होते. त्यामुळे पालुबेन घरी एकट्याच होत्या. याचवेळी जिग्नेश घरी आला. आजी एकटी असल्याचे पाहून त्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.
पालुबेन यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर जिग्नेश त्यांच्याशी भांडू लागला. पैसे दिले नाहीत, तर गळा दाबून ठार मारू, अशी धमकी त्याने दिली. पालुबेन यांच्यावर अलीकडेच मोठी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे मोठा आवाज आणि ताण सहन होत नसल्याने त्या घाबरल्या आणि बेशुद्ध पडल्या. जिग्नेशने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या शुद्धीवर आल्या नाहीत. या अवस्थेत मदत बोलावण्याऐवजी जिग्नेशने संधी साधत पालुबेन यांच्या कानातील कर्णफुले आणि अंगठी काढली आणि घराबाहेरून दरवाजाला कुलूप लावून तो पसार झाला.
वडिलांनी दार तोडताच भयंकर दृश्य
सायंकाळी पालुबेन यांचा मुलगा घरी परतला त्यावेळी दरवाजाला टाळे पाहून त्यांनी आजूबाजूला चौकशी केली. सुरुवातीला जिग्नेश पालुबेन यांना बाहेर घेऊन गेला असावा, असे त्याला वाटले. मात्र बराच वेळ होऊनही दोघेही परतले नाहीत. त्यामुळे पालुबेन यांच्या मुलाने शेजारच्यांच्या मदतीने टाळे तोडून दरवाजा उघडला. आईला बेशुद्ध पडलेले पाहून त्याने पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्यांना त्वरित रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेच्या तीन दिवसांनंतर पोलिसांनी जिग्नेश याला पकडले, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. आजीला मदतीविना मृत्यूच्या दारात सोडून पळाल्याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी जिग्नेशवर सदोष मनुष्यवधासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे, नवी मुंबई येथील कळंबोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांमध्ये अज्ञात वाहनचालकांनी धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. कळंबोली पोलिसांनी या दोन्ही अपघातां प्रकरणी वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
ट्रेलरचा बाईकला हलका धक्का
कळंबोलीत राहणारे अमित पवार (३७) हे बुधवारी, १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.४५च्या सुमारास मोटारसायकलवरून कळंबोली सर्कलच्या दिशेने जात होते. स्टील मार्केट रोडवर ते आले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रेलरने त्यांच्या मोटारसायकलला हलका धक्का दिला. त्यामुळे अमित पवार हे दुचाकीवरून खाली पडून ट्रेलरच्या मागील चाकाखाली आले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा