Headlines

Mumbai Bhuleshwarcha Raja Idol Collapsed due to Welding Failure During Arrival Ceremony Two People Died; ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटना प्रकरणात नवीन माहिती समोर, कशामुळे बाप्पाची मूर्ती कोसळली? पोलिसांच्या तपासात खरं कारण समोर


Mumbai Bhuleshwarcha Raja Two People Death : या अपघातात ‘भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चे तरुण अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन लहान मुलींसह पाच जण जखमी झाले आहेत.

Mumbai Bhuleshwarcha Raja Two People Death
भुलेश्वरचा राजा गणपती मूर्ती कोसळली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाची घाऊ सुरू असून अनेक गणेश मंडळांकडून बाप्पाच्या मूर्तीचं मंडळात उत्साहात आगमन केलं जात आहे. मात्र, काल शनिवारी रात्री भुलेश्वर येथे झालेल्या घटनेनंतर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘ भुलेश्वरचा राजा ‘ या २७ फूट उंच गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान झालेल्या अपघातानं मूर्ती कोसळली. तर, दोन जण ठार झाले. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या तपासात आता नवीन माहिती समोर येत आहे.

एक मोठी अपडेट समोर

शनिवारी, रात्री झालेल्या भुलेश्वरचा राजाची मूर्ती कोसळल्यानंतर तातडीनं पोलिसांनी यंत्रणा कामी लावली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घडलेल्या भीषण अपघाताप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. सुरुवातीच्या तपासानुसार, मूर्तीचा भार तोलणाऱ्या क्रेनचे नटबोल्ट तुटल्यानं अपघात झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळेच हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत होतं. आता, भुलेश्वरमधील अपघाताच्या तपासात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Maharashtra TimesPanjabrao Dakh Weather Forecast : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस एन्ट्री मारणार, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

तपासात कोणती नवी माहिती?

पोलिसांच्या तपासानुसार, केवळ नटबोल्ट तुटले नव्हते, तर क्रेन आणि सपोर्ट सिस्टीममधील मुख्य वेल्डिंगही अचानक तुटल्याचं तपासात उघड झालं आहे. या नव्या तांत्रिक त्रुटीमुळे अपघाताचे गांभीर्य आणि क्रेन मालकाचा निष्काळजीपणा अधिकच स्पष्ट झाला आहे.

वेल्डिंगमधील त्रुटी पडली महाग

मुंबईतील अतिउंच गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन करताना मूर्तीचा तोल सांभाळण्यासाठी तसेच तिला सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष लोखंडी सपोर्ट आणि वेल्डिंगचा वापर केला जातो. भुलेश्वरच्या राजाच्या मूर्तीसाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रक्चरमध्ये क्रेनच्या जोडणीजवळ वेल्डिंग करण्यात आलं होतं. मात्र, हे वेल्डिंग अचानक तुटलं. वेल्डिंग तुटल्यानं नटबोल्टवरील दाब वाढला आणि तेही तुटलं असावं. ज्यामुळे २७ फुटांची भव्य मूर्ती थेट कार्यकर्त्यांवर कोसळली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Maharashtra TimesKhavdya Dongar Case : सत्य माहीत नसताना निव्वळ व्ह्यूजसाठी खोट्या गोष्टी पसरवल्या; संगीता चांदगुडे यांच्या बहिणीचा संताप

मंडळाच्या अध्यक्षाचा मृत्यू

दरम्यान, भुलेश्वरच्या राजाची ही मिरवणूक भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेनं निघाली होती. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मंडप अवघ्या 50-60 मीटर अंतरावर बाप्पाची मूर्ती आली होती. याचदरम्यान 22 फूट मूर्तीचा तोल गेला. त्याखाली मंडळातील काही कार्यकर्ते दबले गेले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींची नावे संकेत नेवशे (वय 33) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय 30) अशी आहेत. या दोघांना रुग्णालयात आणलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. जखमी झालेल्या पाच जणांमध्ये 5 आणि 7 वर्षे वयाच्या दोन मुलींचा समावेश होता. जखमींवर जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हृदयद्रावक बाब म्हणजे, या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांचा मृत्यू झाला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा