Headlines

Multibagger Stock; लखपतींचे नशीब पालटणारा स्टॉक; 3 वर्षांतला परतावा पाहून गुंतवणूकदारांचे डोळे चक्रावले; कंडोम कंपनीवर वाढला विश्वास


Multibagger Stock Returns: शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक्सकडे छोट्या-बड्या सर्वांची नजर असते. देशांतर्गत बाजारात सूचिबद्ध पुरुष आणि महिलांसाठी कंडोम बनवणाऱ्या क्युपिड लिमिटेडचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या कंपनीने अवघ्या 3 वर्षांत आपल्या भागधारकांना श्रीमंत केले आणि खिशात खळखळाट केला. या काळात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला.

क्यूपिड लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना तीन वर्षांत 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 85 लाखांहून अधिक परतावा मिळाला. यादरम्यान, कंपनीने भागधारकांना सलग तीनदा बोनस शेअर्सही दिले असून ही मल्टीबॅगर कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या Group A मध्ये प्रवेश करत आहे. बुधवार, 15 जुलै रोजी, क्युपिडचा शेअर 1.31% टक्के वाढीसह 219.60 रुपयांवर क्लोज झाला. पाच वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत फक्त 2.43 रुपये होती आणि त्यावेळी लाखांची गुंतवणूक करणारे आता करोडपती बनले असतील.

Maharashtra TimesUS Tariff Threat: 500% शुल्क नको, पण 100% टॅरिफ तर द्यावाच लागेल! रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेची भारतावर कारवाई
मल्टीबॅगर कंपनीबद्दल जाणून घ्या

क्यूपिड लिमिटेड, आरोग्यसेवा आणि वैयक्तिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी, पुरुष व महिला कंडोम, वॉटर-बेस्ड ल्युब्रिकंट जेली आणि IVD किट्सचे उत्पादन करते. सध्या कंपनीची दरवर्षी 48 कोटी पुरुष कंडोम आणि 52 कोटी महिला कंडोम उत्पादन करण्याची क्षमता असून कंपनीने आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीसाठी आपल्या महसुलाचा अंदाज वाढवला. पहिल्या तिमाहीत महसूल 150 कोटींपेक्षा जास्त होईल, जी कंपनीची आतापर्यंतची सर्वोत्तम तिमाही कामगिरी ठरू शकते असा कंपनीचा अंदाज आहे.

Maharashtra TimesCrude Oil : तेल बाजारावर संकटाचे सावट; US-Iran संघर्षाने घेतले धोकादायक वळण, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या

5 वर्षांत 10000 रुपयांचे झाले 8,79,423 रुपये

क्यूपिड लिमिटेडचा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा नफा मिळवून दिला आणि दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर परतावा दिला. गेल्या महिन्यात या स्टॉकमध्ये 42% वाढ झाली असून मागील 3 महिन्यांत या शेअरने 133 टक्क्यांची उभारी घेतली, तर गेल्या सहा महिन्यांत 154% वाढ झाली.

तसेच या गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर स्टॉकने तब्बल 874% परतावा दिला असताना या दरम्यान मागील 5 वर्षांत स्टॉकमध्ये जवळपास 8,760% वाढ झाली. 9 जुलै 2021 रोजी या स्टॉकची किंमत फक्त 2.43 रुपये होती, जी आता वाढून 219 रुपये झाली आहे.

Maharashtra TimesBab el-Mandeb: आधी इराणने अडवणूक केली, आता त्याचा मित्रही तेल कोंडी करणार! बाब एल-मंडेबचा गळा आवळणार येमेन

1 लाखाचे झाले 85 लाखांपेक्षा जास्त

14 जुलै, 2023 रोजी क्युपिड लिमिटेडचे ​​शेअर्स 2.53 रुपयांवर ट्रेड करत होते, तर 15 जुलै, 2026 रोजी शेअर्स 219 रुपयांवर बंद झाले. अशाप्रकारे, एखाद्याने 3 वर्षांपूर्वी क्युपिड लिमिटेडच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले आणि आतापर्यंत गुंतवणूक कायम ठेवली असेल तर 1 लाखात खरेदी केलेल्या शेअर्सची सध्याची किंमत 85.67 लाख रुपये झाली असेल. अशाप्रकारे, मागील तीन वर्षांत या क्युपिड लिमिटेडच्या शेअर्सनी 8493% उंच झेप घेतली.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत