Headlines

Mike Tyson Bankruptcy; तरुणपणी हजारो कोटी रुपये कमावले, व्यसनाच्या आहारी 3000 कोटी उधळणारा ‘चॅम्पियन’; मजा मारण्‍यातच झाला उद्ध्‍वस्‍त

Billionaire Bankruptcy: बॉक्सिंग रिंगमधील या दिग्गजने आपल्या कारकिर्दीत जितके यश मिळवले, तितकेच अनेक वादही गाजवले. तरुणपणी लाखो डॉलर्स कमावलेल्या टायसनने 2003 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली. पैशांची उधळपट्टी, व्यसन आणि इतर कारणांमुळे टायसनचे आयुष्य उद्ध्वस्त केले.

Mike Tyson Downfall
Mike Tyson Bankruptcy: जागतिक सर्वात महान बॉक्सर्सच्या यादीत माईक टायसनचे नाव नेहमीच आघाडीवर असेल. माईक टायसन रिंगमध्ये उतरायचे तेव्हा प्रतिस्पर्ध्यांचा थरकाप उडायचा. ‘द स्टॉर्म ऑफ द रिंग’ आणि ‘आयर्न माईक’ यासारख्या नावांनी माईक ओळखले जायचे. पण महान बॉक्सरसोबतच टायसनचे आयुष्य आणि कारकीर्द अनेक वादांनी गाजली. कारकिर्दीच्या शिखरावर असताना टायसनकडे प्रचंड संपत्ती होती, परंतु 2003 मध्ये दिवाळखोर घोषित केले गेले. पण या रावाचा रंक होण्याची कहाणी खूप रंजक आहे.

माइक टायसनची बॉक्सिंग कारकीर्द

माइक टायसनची बॉक्सिंग कारकीर्द

माईक टायसनन व्यावसायिक बॉक्सिंग कारकिर्दीत एकूण 57 सामने लढले, त्यापैकी 50 सामने त्याने जिंकले. तसेच यापैकी 44 सामने सरळ नॉकआऊटने जिंकल्यामुळे टायसनला ‘द स्टॉर्म ऑफ द रिंग’ आणि ‘आयर्न माईक’ या नावांनी ओळखले जाऊ लागले. माईक टायसनला आपल्या कारकिर्दीत केवळ 7 पराभव पत्करावे लागले, त्यापैकी 5 नॉकआऊट आणि एक अपात्रतेमुळे झाला.

चोरीने डागाळलेले बालपण

चोरीने डागाळलेले बालपण

माईक टायसनचा जन्म 30 जून 1996 साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. टायसनच्या जन्मानंतर आईवर मुलाची जबाबदारी सोडून वडील घर सोडून गेले. क्वचितच घरी येत असल्यामुळे आईदेखील माईकवर नाराज राहायच्या. दिवसा रस्त्यावर मारामारी करणे, दुकानांमधून कपडे चोरणे – यातच त्यांचं बालपण गेलं.

तुरुंग बनलेले दुसरे घर

तुरुंग बनलेले दुसरे घर

13 व्या वर्षांपर्यंत टायसनला 38 वेळा अटक झालेली. हायस्कूलचे शिक्षणही पूर्ण न करता माईकने घर सोडले. बालपणीच वडील सोडून गेल्यावर वयाच्या 16 व्या वर्षी आईच छत्रही हरपलं. या दरम्यान, माजी बॉक्सर बॉबी स्टीवर्टने सर्वातआधी टायसनची प्रतिभा ओळखली आणि त्याला प्रशिक्षण देऊ लागले. जसजसे माईकचे बॉक्सिंग कौशल्य सर्वत्र प्रसिद्ध झाले, तसतसे इतर अनेक नामांकित प्रशिक्षक त्याच्यासोबत सामील झाले.

ज्युनियर ऑलिम्पिक्समध्ये मोठी झेप

ज्युनियर ऑलिम्पिक्समध्ये मोठी झेप

1981 आणि 1982 च्या ज्युनियर ऑलिम्पिक्समध्ये चाहत्यांनी टायसनची प्रतिभा सर्वप्रथम पाहिली, जिथे त्याने सुवर्णपदके जिंकली. माईकची कीर्ती बॉक्सिंग जगतात झपाट्याने पसरली आणि लगेचच मार्च 1985 मध्ये पहिला व्यावसायिक बॉक्सिंग सामना खेळला. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने दिग्गज हेक्टर मर्सिडीजला पहिल्याच फेरीत नॉकआऊट केले. त्यानंतर आपल्या पहिल्या 28 पैकी 26 सामने नॉकआऊटने जिंकले.

शारीरिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगवास

शारीरिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगवास

टायसन बॉक्सिंग रिंगमध्ये झपाट्याने प्रगती करत होते, पण वैयक्तिक आयुष्यातील गोंधळामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला पुन्हा डाग लागला. 1991 मध्ये 18 वर्षीय डेझिरी वॉशिंग्टनवर शारीरिक शोषणाच्या आरोपाखाली टायसनला अटक झाली. सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली, पण अखेरीस 1995 मध्ये सुटका झाली.

बॉक्सिंग रिंगमध्ये कमबॅक अन् करोडोंची कमाई

बॉक्सिंग रिंगमध्ये कमबॅक अन् करोडोंची कमाई

शिक्षा भोगून रिंगमध्ये परतल्यावर टायसनबद्दल उत्साह कमी होण्याऐवजी आणखी वाढली. रिंगमधील कमबॅकच्या पहिल्याच लढतीने महसूल आणि प्रेक्षकसंख्येचे मागील सर्व विक्रम मोडले व एकाच लढतीने जगभरातून 96 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.

बॉक्सरच्या कानाचा चावा घेतला

बॉक्सरच्या कानाचा चावा घेतला

1996 मध्ये इव्हेंडर होलीफील्डने जागतिक हेवीवेट विजेतेपदाच्या लढतीत टायसनला बाद केले, ज्यामुळे जगभर खळबळ उडाली. या पराभवानंतर टायसनचा राग असह्य झाला होता आणि पुढील वर्षी त्या दोघांमध्ये एक भव्य लढत आयोजित केली गेली, ज्यासाठी टायसनला 30 दशलक्ष डॉलर्स मिळाले. याच सामन्यात टायसनने होलीफील्डच्या कानाचा भाग चावून तोडला आणि बॉक्सिंग मॅच अर्ध्यावरच संपली. बॉक्सिंग रिंग रक्ताने माखली आणि कानाचा एक तुकडा रिंगच्या मध्यभागी पडून राहिला. पंचांनी तात्काळ टायसनला अपात्र ठरवले. टायसनचा बॉक्सिंग परवानाही काही काळासाठी रद्द केला गेला.

सर्वात श्रीमंत खेळाडू

सर्वात श्रीमंत खेळाडू

1998 मध्ये टायसनने पुन्हा पुनरागमन केले आणि त्यानंतर दोन मोटारसायकलस्वारांवर हल्ला केल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला, मग एका लढतीत आपल्या प्रतिस्पर्ध्याचा हात मोडण्याचा प्रयत्नही केला. एका क्षणी बॉक्सिंग विश्वात टायसनबद्दल लोकांमधील लोप्रियता इतकी वाढलेली की बॉक्सिंग सामन्याची तिकिटे झटपट विकली गेली आणि टीव्ही प्रसारकांनी मोठा नफा कमावण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच, टायसन जागतिक खेळांमधील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी बनले.

वाघ पाळण्यापासून ते दिवाळखोर घोषित होण्यापर्यंत

वाघ पाळण्यापासून ते दिवाळखोर घोषित होण्यापर्यंत

एकीकडे टायसन आपली तिजोरी भरत होते, तर दुसरीकडे त्यांचा खर्चही वाढत होता. घरासाठी कोट्यवधी रुपये खार करण्यापासून ते रॉयल बेंगॉल वाघ पाळणे, कोट्यवधी रुपयांचे दागिने, जगातील प्रत्येक प्रकारची वाहने, आणि जगभरातील विविध ठिकाणी कोट्यवधी रुपयांची घरे खरेदी करण्यापर्यंत टायसनची उधळपट्टी सुरूच होती. यामुळे टायसनने रिंगकडे दुर्लक्ष केले आणि एकाच वर्षात जवळपास 70 दशलक्ष डॉलर्स उधळले. यामुळे अखेरीस ऑगस्ट 2003 मध्ये टायसनचे कर्ज इतके वाढले की त्याला दिवाळखोरी जाहीर करणे भाग पडले.

आलिशान गाड्या, बंगल्यांवर पैशाची उधळपट्टी

आलिशान गाड्या, बंगल्यांवर पैशाची उधळपट्टी

कारकिर्दीच्या शिखरावर असताना टायसन प्रत्येक लढतीतून लाखो रुपये कमवायचे. लेनोक्स लुईसविरुद्ध 2002 च्या लढतीतून 103 दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 850 कोटी रुपये कमावले. यापैकी 75 दशलक्ष डॉलर्स पे-पर-व्ह्यू बोनस होते. अशाप्रकारे, टायसनने कारकिर्दीत एकूण 400 दशलक्ष डॉलर्स किंवा अंदाजे 3300 कोटी रुपयेपेक्षा जास्त कमाई केली होती. पण खर्चापायी सगळं गमावून बसले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा