Headlines

Monsoon Session Parliament Adjournments Washout; सरकार-विरोधकांच्या गदारोळामुळे 175 कोटींचा चुराडा; करदात्यांचा घामाचा पैसा वाया

​Parliament Deadlock Financial Impact: 2026 पावसाळी अधिवेशन केवळ अलिकडच्या वर्षांतील संसदेच्या सर्वाधिक व्यत्यय आलेल्या अधिवेशनांपैकी नव्हते, तर त्यासाठी देशातील करदात्यांना मोठी आर्थिक आणि संस्थात्मक किंमतही मोजावी लागली.

parliament disruption taxpayers money
सरकार-विरोधकांच्या गदारोळामुळे 175 कोटींचा चुराडा; करदात्यांचा घामाचा पैसा वाया
Parliament Monsoon Session 2026: अनेक आठवड्यांचा व्यत्यय, वारंवार स्थगित होणारे कामकाज आणि राजकीय कोंडी यांनंतर गुरुवारी संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाले आणि त्यासोबतच पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. मात्र, निषेध आणि घोषणाबाजीच्या नेहमीच्या दृश्यांच्या पलीकडे एक वेगळेच नुकसान दडलेले आहे, ते म्हणजे करदात्यांच्या पैशातून उपलब्ध झालेला संसदीय वेळ जो चर्चा, छाननी आणि उत्तरदायित्वासाठी वापरलाच गेला नाही.

संसद लॉगजॅमचे करदात्यांवरील पडसाद

संसद लॉगजॅमचे करदात्यांवरील पडसाद

20 जुलै रोजी सुरू झालेले पावसाळी अधिवेशन 13 जुलै रोजी संपले. या दरम्यान वारंवार होणारे कामकाज तहकूब आणि व्यत्ययांमुळे संसदेचा 7023 मिनिटांचा वेळ वाया गेला. अशाप्रकारे संसदेचे प्रत्येक मिनिटाला 2.5 लाख रुपये हा सर्वमान्य कार्यचालन खर्च विचारात घेतल्यास अंदाजे 175.6 कोटी रुपये नुकसान झाले.

प्रश्नोत्तर सत्राचा बळी

प्रश्नोत्तर सत्राचा बळी

संसदीय लोकशाहीमध्ये प्रश्नोत्तराचे सत्र किंवा वेळ खूप महत्त्वाचा असतो. या काळात कोणताही खासदार मंत्र्यांना विभाग, धोरण, पेपरफुटी, बेरोजगारी, आरोग्य किंवा सरकारी खर्चाबद्दल थेट प्रश्न विचारू शकतो. तसेच पुरवणी प्रश्नही विचारू शकतो. PRS नुसार, प्रश्नोत्तराच्या तासाची वेळ वाढवून विधानमंडळाच्या वेळेची होणारी हानी भरून काढता येते, पण प्रश्नोत्तराच्या तासाचा कालावधी एकदा संपला की भरून काढता येत नाही. 16 व्या लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास नियोजित वेळेच्या केवळ 67% वेळ चालला. याआधी 2023 च्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत आठ दिवस प्रश्नोत्तराचा तास एक मिनिटभर चाललेला.

एका अधिवेशनासाठी किती खर्च येतो?

एका अधिवेशनासाठी किती खर्च येतो?

संसदेतील व्यत्ययांविषयी चर्चेत प्रत्येक मिनिटाला 2.5 लाख रुपये हा आकडा अनेकदा सांगितला जातो, जो 2012 सालचा अंदाज आहे, जेव्हा तत्कालीन संसदीय कामकाज मंत्री, पवन कुमार बन्सल यांनी संसद चालवण्यासाठी अंदाजे प्रत्येक मिनिटाला 2.5 लाख रुपये खर्च येत असल्याचे सांगितलेले. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभाया दोन्ही सभागृहांसाठी प्रत्येकी अंदाजे 1.25 लाख रुपये खर्च येतो. तर राजकीय पक्षांच्या व्यत्ययांच्या आर्थिक खर्चाचा अंदाज लावताना PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्चनेही हाच आकडा नमूद केला.

या खर्चात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो?

या खर्चात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो?

या खर्चात खासदारांचे पगार आणि भत्ते, ज्यामध्ये Per Diem, प्रवासाचा खर्च आणि इतर सुविधांचा समावेश असतो. याशिवाय संसद भवनाची देखभाल – जसे की वीज, पाणी, सुरक्षा, अत्याधुनिक उपकरणे आणि आयटी पायाभूत सुविधांचा – समावेश आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, ज्यात संसद सचिवालय, मार्शल, वार्ताहर, अनुवादक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या खर्चाचा प्रसारण आणि सुरक्षा, तसेच दळणवळण आणि सुरक्षा व्यवस्था यांचा समावेश असतो.
अशाप्रकारे, खासदार सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देत नाही तेव्हा नियोजित कायदेविषयक कामकाज होऊ शकत नसले तरीही संसदेवरील खर्च—म्हणजेच, तिच्या इमारती, कर्मचारी, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इतर पायाभूत सुविधांवरील खर्च—सुरू राहतो.
(नोट: हा आकडा संसदीय कामकाज मंत्रालयाच्या अधिकृतपणे मंजूर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्प आणि अंदाजांवर आधारित आहे).

जनतेला काय मिळालं

जनतेला काय मिळालं

संसदेकडून कायदे केवळ मंजूर व्हावेत यासाठीच करदाते टॅक्स भरतात असे नाही, तर त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सरकारला जबाबदार धरू शकतील, धोरणांमधील त्रुटी उघड करू शकतील आणि सार्वजनिक निधीचा हिशोब ठेवू शकतील यासाठीही कर भरतात.

प्रत्येक नागरिक/करदात्यावर होणारा परिणाम

प्रत्येक नागरिक/करदात्यावर होणारा परिणाम

भारताची एकूण 1.4 अब्ज लोकसंख्या विचारात घेतल्यास, संपूर्ण पावसाळी अधिवेशनाचा अंदाजित खर्च 150 कोटी रुपये असल्यास प्रत्येक नागरिकावर 1.07 (एक रुपया सात पैसे) खर्च येतो. तसेच भारतात अंदाजे 8 कोटी ते 8.5 कोटी लोक आयकर विवरणपत्र दाखल करतात. अशाप्रकारे, यानुसार प्रत्येक आयकरदात्यामागे पावसाळी अधिवेशन चालवण्याचा अंदाजे 18 रुपये ते 20 रुपये खर्च येतो.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा