Headlines

Mohammad Azharuddin :भारताचा स्टार कर्णधार, दोन मुलांचा बाप; पण अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून पाय घसरला, येथूनच लागली उतरती कळा… आता मंत्रिमंडळात मंत्री – mohammad azharuddin sangeeta bijlani love story and journey biography about career


Mohammad Azharuddin Sangeeta Bijlani : बॉलिवूड आणि क्रिकेटमध्ये प्रेमसंबंध नवीन नाहीत. पण एका विवाहित क्रिकेटपटूच्या आयुष्यात एका अभिनेत्रीची एंट्री झाली आणि त्यानंतर त्याचं संपूर्ण वैयक्तिक आयुष्यच बदलून गेलं. हा क्रिकेटपटू फक्त संघाचा सदस्य नव्हता, तर कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडत होता. माजी मिस इंडियाच्या सौंदर्याला पाहून भारताच्या कर्णधाराची विकेट पडली. पहिल्या नजरेत घायाळ झालेल्या या कर्णधाराचं या भेटीनंतर संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. दोन मुलांचा पिता असतानाही त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर प्रचंड आवडलेल्या अभिनेत्रीसोबत लग्नही केलं, पण तेही टिकलं नाही. कोण आहे तो कर्णधार आणि ती अभिनेत्री, ज्यांची देशभरात सर्वत्र चर्चा झाली होती? जाणून घ्या.

Mohammad Azharuddin Sangeeta Bijlani
Mohammad Azharuddin Sangeeta Bijlani Full Story

एका जाहिरातीच्या शूटमध्ये दोघांची भेट

एका जाहिरातीच्या शूटमध्ये दोघांची भेट

मोहम्मद अझहरुद्दीन यांची भेट अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया संगीता बिजलानींसोबत झाली. एका जाहिरातीच्या शूटमध्ये दोघे भेटले होते. संगीता बिजलानींना पाहताच अझहरुद्दीन यांची विकेट पडली होती. एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलं की, संगीता बिजलानींना पाहताच क्षणी मी त्यांच्या प्रेमात पडलेलो. संगीतासोबत राहण्यासाठी मोहम्मद अझहरुद्दीन हे घरी जायचेच बंद झाले होते. कारण स्टारडम असल्याने अनेक बॉलिवूड पार्टीमध्ये हजेरी लावायचे. भारतासाठी खेळत असताना सराव सत्राला दांडी मारून हे सर्व काही सुरू होतं.

१९९६ मध्ये पहिली पत्नी नौरिनसोबत घटस्फोट

१९९६ मध्ये पहिली पत्नी नौरिनसोबत घटस्फोट

माध्यमांमध्ये दोघांच्या नात्याच्या चर्चा येऊ लागल्य होत्या. संगीता बिजलानी आघाडीच्या अभिनेत्रींपैकी असल्याने दोघांच्या अफेरच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. काही दिवसांनी ज्याची भीती तेच झालं. दोन मुले असतानाही अझहरुद्दीन यांनी १९९६ मध्ये पहिली पत्नी नौरिनसोबत घटस्फोट घेतला. त्याचवर्षी संगिता बिजलानी यांच्यासोबत लग्न केले होते. असंही म्हटलं जातं की संगीत यांनी अझहरुद्दीन यांच्यासोबत लग्न करताना इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर त्यांचे नाव आयशा बेगम करण्यात आले होते.धर्मांतर केल्यासंदर्भाता कोणतीही ठोस माहिती की पुरावे समोर आले नाहीत.

सलमान खानसोबत लग्नाच्या चर्चा

सलमान खानसोबत लग्नाच्या चर्चा

मीडिया रिपोर्टनुसार संगीता बिजलानी आणि अभिनेता सलमान खान हे रिलेशनशीपमध्ये होते. दोघे लग्नही करणार होते आणि त्यांच्या लग्नाचे कार्डही छापले गेल्याचं बोललं जातं. यानंतरच संगिता आणि मोहम्मद अझहरुद्दीन हे एकमेकांच्या संपर्कात आले होते. दोघांच्याही लग्नाच्या चर्चा बरेच दिव सुरू होत्या. दोघांनी छुप्या पद्धतीने लग्न केल्याचं बोललं जातं. १९९६ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना अझहरुद्दीन संगिता या सोबत गेल्या होत्या. त्यामुळे दोघांच्या नात्याबाबत सर्वांना माहिती झाले होते. काही दिवसांनी घटस्फोट घेत दुसरे लग्न संगिता बिजलानी यांच्यासोबत केले होते.

मोहम्मद अझहरुद्दीन आणि संगिता बिजलानी १४ वर्षांनी दोघेही विभक्त

मोहम्मद अझहरुद्दीन आणि संगिता बिजलानी १४ वर्षांनी दोघेही विभक्त

मोहम्मद अझहरुद्दीन आणि संगिता बिजलानी दोघे एकत्र आले आणि लग्नासारखा मोठा निर्णय दोघांनी घेतला पण १४ वर्षांनी दोघेही विभक्त झाले. २०१० मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१४ त्या निवडणुकीमध्ये अझहरुद्दीन यांच्या प्रचारासाठी संगिता बिजलानी आल्या होत्या. संगिता यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेण्यामागे एक गोष्ट बोलली जाते ती म्हणजे भारताची बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टासोबत अझहरुद्दीन यांचे संबंध असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. ज्वाला गुट्टासोबतच्या नात्यावर दोघांकडून अधिकृत असे काही स्टेटमेंट आले नाही.

शेनम मेरी तलवारसोबत नाव जोडले गेले

शेनम मेरी तलवारसोबत नाव जोडले गेले

यादरम्यान मोहम्मद अझहरुद्दीन यांचे नाव मूळ अमेरिकेची असलेल्या शेनम मेरी तलवारसोबत जोडले गेले. पॅरिसमधील दोघांचे अनेक फोटो समोर आले असून त्यांनी तिसरे लग्न केल्याचीही चर्चा आहे. पण अझहरुद्दीन यांनी शेनन ही माझी मैत्रीण असल्याचं २०१५ मध्ये ट्विट करत सांगितलं होतं. आताही सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतील. भारताचा कर्णधार फिक्सिंगचे आरोप झाल्याने बॅन लावण्यात आला होता. जो २०१२ मध्ये हटवला गेला तोपर्यंत संपूर्ण करियर संपले होते. पहिले लग्न आयुष्यातील आठवणीत राहणारा दिवस असे सांगितलेल्या अझहरुद्दीन यांनी दुसरे लग्न केले पण तेही टिकले नाही. क्रिकेटच्या मैदानातील सुपरहिरो असलेल्या अझहरुद्दीन यांच्या आयुष्यात चढ उतार पाहायला मिळाले.

मोहम्मद अझहरुद्दीन कारकीर्द

मोहम्मद अझहरुद्दीन कारकीर्द

मोहम्मद अझहरुद्दीन यांनी ३१ डिसेंबर १९८४ ला पदार्पण केले होते. कोलकातामधील ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात ११० धावा केल्या होत्या. त्यानंतर दोन्ही सामन्यात शतके करत अशी कामगिरी करणारे पहिले फलंदाज ठरले होते. १९८८ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध वडोदरा येथे झालेल्या सामन्यात ६२ चेंडूत वेगवान वनडे शतक ठोकले होते. १९८९ मध्ये भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली होती. भारताकडून १९९२, १९९६ आणि १९९९ या तीन वर्ल्डकपमध्ये नेतृत्त्व केले होते. ९९ कसोटी सामन्यात ६२१५ धावा करताना २२ शतके आणि २१ अर्धशतके, ३३४ वनडे मध्ये ९३७८ धावा करताना ७ शतके आणि ५८ अर्धशतके केली आहेत.

भारतातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, हॅन्सी क्रोनिएच्या जबाबात अझहरूद्दीनचे नाव

भारतातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, हॅन्सी क्रोनिएच्या जबाबात अझहरूद्दीनचे नाव

दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएने दिलेल्या जबाबामध्ये अझहरूद्दीन यांचे नाव समोर आले. बुकींशी अझहरूद्दीन यांच्यामार्फत संपर्क साधल्याचं त्यांने सांगितलं होतं. त्यामुळे भारतातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. भारताचा कर्णधाराबाबत असे समोर आल्याने हे काही सोप नव्हते. सीबीआयने चौकशी अहवाल दिला आणि त्यामध्ये अझहरूद्दीनसह अजय जडेजा आणि नयम मोंगिया यांची नावे समोर आली होतीत. बीसीसीआयने डिसेंबर २००० मध्ये अझहरूद्दीन यांच्यावर आजीवन बंदी घातली होती. या आरोपांविरूद्ध अझहरूद्दीन यांनी कोर्टात धाव घेतली आणि लढा दिला आणि १२ वर्षांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये अझहरूद्दीन यांची बंदी हटवली गेली. एखाद्या चित्रपटासारखाच अझहरूद्दीन यांचा जीवनप्रवास राहिला. अझहरूद्दीन यांच्यावर ‘अझहर’ नावाचा चित्रपटही आहे.

मोहम्मद अझहरूद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री

मोहम्मद अझहरूद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री

मोहम्मद अझहरूद्दीन हे २०१३-१४ ला काँग्रेसकडून मुरादाबाद येथून लोकसभा निवडणूक लढवून ते खासदार झाले. २०१८ ला तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. २०१९ ला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले. २०२१ मध्ये असोसिएशन अंतर्गत वाद वाढल्याने त्यांनी हटवलं गेलं. २०२४ ला ईडीने त्यांना समन्स बजावल. २०२५-२६ मध्ये तेलंगणा सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. अल्पसंख्याक कल्याण आणि सार्वजनिक उपक्रम हे खाते देण्यात आले आहे. आता झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला होता. क्रिकेटनंतर आता राजकीय इनिंग सुरू आहे.

पहिल्या नजरेतलं प्रेम… आणि आयुष्याला मिळालेलं वेगळं वळण

पहिल्या नजरेतलं प्रेम… आणि आयुष्याला मिळालेलं वेगळं वळण

करियरच्या सुरूवातीच्या तीन सामन्यात सलग तीन शतके ठोकत आपल्या दमदार एन्ट्रीने सर्वांची मने जिंकणारा वंडर बॉय म्हणजे भारताचा मोहम्मद अझहरुद्दीन. भारतीय संघाचे कर्णधार असताना मोहम्मद अझहरुद्दीनसाठी चाहते वेडे होते. कॉलर कायम हवेत आणि गळ्यात ताईत ठेवत खेळणारे मोहम्मद अझहरुद्दीन सुपरस्टारपेक्षा कमी नव्हते. १९८७मध्ये मोहम्मद अझहरुद्दीनचे नौरिनसोबत अरेंज मॅरेज झालं होतं. नौरिन १६ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह झाल्याचं म्हटलं जातं. लग्नानंतर दोघांना दोन मुलं झाली होतीत. सर्व काही सुरळित सुरू होतं. पण ही येणाऱ्या वादळाआधीची शांतता म्हणावी लागेल.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा