Headlines

Milk Price Hike In Mumbai ; सामन्यांचे सणासुदीचे बजेट कोलमडणार! साखर झाली आता दुधाच्या किंमती महागणार, जाणून घ्या नव्या किंमती


साखरेचा भाव आधीच गगनाला भिडला आहे त्यात दुधाच्या किंमती वाढणार आहेत. मुंबईत दुधाच्या नव्या किंमती लागू होणार आहेत. ही दरवाढ तबेल्यातल्या म्हशीच्या दुधासंबंधित आहे. त्यामुळे तबेल्यातल्या म्हशीचे दूध खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांचे मासिक बजेट प्लॅन आता बिघडणार आहे.

नव्या किंमती काय आहेत?

मुंबईत विकल्या जाणाऱ्या तबेल्यातील म्हशीच्या दुधाच्या किंमतीत 9 रुपयांनी वाढ होणार आहे. मुंबईत या दुधाचे सध्याचे दर 93 रुपये प्रति लिटर आहे. या किंमतीत थेट 9 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. 1 सप्टेंबरपासून हे दूध 102 रुपये प्रति लिटर या नव्या किंमतीने विकले जाईल. तर 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत दुधाची किंमत सारखीच राहील.

फक्त मुंबईकरांच्या मासिक बजेटवर होणार परिणाम

सदर दुधाच्या किंमतीत वाढ फक्त मुंबई शहरात होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मासिक बजेट कोलमडणार आहे. रोज दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांना महिन्याला अधिकचे 270 रुपये मोजावे लागणार आहे. किंमत पुढच्या सहा महिन्यांसाठी सारखीच राहणार असल्यामुळे मुंबईकरांना दररोजच्या 1 लिटर दुधासाठी पुढच्या सहा महिन्यांत एकूण 1,620 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहे.

दुधाच्या किमतीत इतकी दरवाढ का?

दूध दरवाढीचा निर्णय दूध उत्पादकांकडून घेण्यात आला आहे. त्यांचे म्हणणे आहे की पशूंच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. त्यांना लागणारा चारा तसेच खळीच्या खर्चात वाढ झाली आहे. पशुखाद्याच्या किंमतीत 25% ने वाढ नोंदवण्यात आली आहे अशा वाढत्या महागाईत दुधाच्या सध्याच्या किंमतीत पशूंचे देखभाल करणे दूध उत्पादकांना कठीण जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वाढत्या महागाईचा विचार करता डेअरी व्यवसाय नीट सुरू ठेवण्यासाठी दुधाच्या सध्याच्या किंमतीत वाढ करणे आवश्यक असल्याचे दूध उत्पादकांचे मत आहे.

Maharashtra Timesकेवळ २२ हजार कोटी नव्हे, यापूर्वी माफ झाले ५७ हजार कोटींचे कर्ज; 5 सर्वात मोठी प्रकरणेमिठाईच्या किंमती महागण्याची शक्यता

देशातील सामान्य नागरिक आधीच साखरेच्या महागाईने त्रस्त आहे. अशात मुंबईत दुधाच्या किंमतीही वाढण्याच्या तयारीत आहे. देशात सणावाराचा हंगाम सुरू होणार आहे. या काळात मिठाई खाण्याचे प्रमाणही अधिक असते. मिठाई बनवण्यासाठी लागणारे दूध आणि साखर महागल्यामुळे यंदा मिठाईच्या किंमतीही जास्त असण्याच्या शक्यता टाळता येत नाहीत.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत