Milk adulteration racket busted in navi mumbai fda conducts raids; मुंबईजवळ दूधभेसळीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त; टँकरमध्ये काय मिसळत होते? FDA च्या धाडीत झाला भांडाफोड
Milk adulteration racket busted in navi mumbai fda conducts raids; मुंबईजवळ दूधभेसळीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त; टँकरमध्ये काय मिसळत होते? FDA च्या धाडीत झाला भांडाफोड
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: महापे एमआयडीसी परिसरातील दूधभेसळीचे जाळे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत उघड झाले. टँकरमध्ये स्किम्ड मिल्क पावडर, पाणी मिसळून भेसळयुक्त दूध तयार केले जात होते. याप्रकरणी १५ जणांविरोधात तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, चार हजार ७१० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. पनीर, मिल्क पावडरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ठाणे एफडीए पथकाने १९ ऑगस्टला महापे येथील मे. पी. के. डेअरीवर छापा टाकला. यावेळी शिवेंद्र जैस्वाल (३४) हा दुधाच्या टँकरमध्ये दुधाची पाकिटे फोडून त्यात स्किम्ड मिल्क पावडर आणि चिलरचे पाणी मिसळताना आढळला. यात डेअरीमालक प्रदीप कमलेश यादव याचाही सहभाग होता. ही डेअरी सील करून चार हजार ७१० लिटर भेसळयुक्त दूध, १२९.५ किलो पनीर, ४७३ किलो मिल्क पावडर, ८८.४ किलो क्रीम जप्त करण्यात आले. महापेतील मे. भास्कर डेअरीकडून ५४८ किलो पावडर आणि पनीर जप्त करून, त्या डेअरीचा परवानाही निलंबित केला आहे. रबाळे येथील मे. नारायण डेअरीतील तीन हजार ६४८ लिटर पाश्चराइज्ड स्किम्ड दूधही नष्ट करण्यात आले.
याप्रकरणी ऐरोलीतील मे. महाराज, मे. विजय, मे. शिवकैलास, मे. रूपसागर, मे. दिनेश आणि मे. बालाजी डेअरी; दिघ्यातील मे. शुक्लम् डेअरी तसेच ठाण्यातील मे. श्रीराम, मे. वासुदेव, मे. राधाकृष्ण, मे. जनम आणि मे. देवनारायण डेअरीशी संबंधित व्यक्तींवर २२ ऑगस्ट रोजी तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या कारवाईत मुंबईतील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पाच अन्न आस्थापनांसह एकूण नऊ आस्थापनांचे परवाने/नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. एमसीएच्या परमीट रुम, पॅव्हिलियन, ओरिएन्ट स्विंग, क्लबवे आणि पँट्री काउंटर यांचा समावेश आहे.
कुर्ल्यातील संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी सोसायटी, माहीम येथील लेनिक्स फूड, शिवाजी पार्क येथील कॅफे कँडल आणि मुलुंड येथील चायना टाऊन फास्ट फूड सेंटर यांच्यावरही कारवाई करण्यात आली. एफडीएने राज्यव्यापी मोहिमेत २५ धाडी टाकल्या. ४५ रेस्टॉरंट व ढाब्यांची तपासणी करून ३३ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर ११ आस्थापनांचे परवाने निलंबित कsले. प्रतिबंधित पानमसाला व गुटख्याच्या प्रकरणांत १७ जणांना अटक करून सुमारे १२.१३ लाख रुपयांचा साठा जप्त केला.
शाळा परिसरात कारवाई
‘महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सुरक्षित अन्न’ अभियानांतर्गत २८ जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान राज्यातील २५० शाळांची तपासणी करण्यात आली. यात ९८ कार्यशाळांमध्ये २२,४३३ शाळा आणि २५,१०८ शिक्षकांनी भाग घेतला. शाळा परिसरात नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा