Headlines

Melghat Water Crisis: ‘जलयुक्त’चे वास्तव कोरडेच! मेळघाटात कोट्यवधींचा निधी मंजूर; मात्र पारंपरिक स्रोतांचाच आधार


Melghat Water Crisis: अनेक गावात नळ असूनही गढूळ पाण्यामुळे पिण्याकरिता महिलांना गावाशेजारच्या विहिरीवरून पाणी आणावे लागते.

melghat water crisis
मेळघाट(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
गजेंद्र बडनेरकर, अमरावती: मेळघाटातील आदिवासींच्या नशिबाचा कोरडेपणा दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून जलयुक्त शिवार २.० आणि जलजीवन मिशनचा गाजावाजा केला जात असला, तरी दुर्गम भागातील वास्तव कमालीचे भीषण आहे. प्रशासकीय फाइल्समध्ये ‘हर घर जल’ अंतर्गत नळाला पाणी आल्याचे चित्र रंगवले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात आदिवासींना आजही पिण्याच्या पाण्यासाठी पारंपरिक विहिरी-तलावांवरच पायपीट करावी लागत आहे. कोट्यवधींचा निधी मिळूनही पाण्याचे संकट कायम असल्याने, योजना नक्की कुणाच्या कल्याणासाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत मेळघाटातील अनेक गावांमध्ये घराघरांत नळजोडण्या दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, या नळांमधून येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक गावांमध्ये तलावातील विहिरींवर आधारित पाणीपुरवठा योजना राबवली गेली आहे. पावसाळ्यात किंवा निसर्गाच्या लहरीपणामुळे हे तलावातील पाणी कमालीचे गढूळ होते. प्रशासन जरी या पाण्याचे ‘क्लोरिनेशन’ करत असल्याचा दावा करत असले, तरी आरोग्याच्या भीतीपोटी ग्रामस्थ हे पाणी पिण्यासाठी वापरण्याचे टाळत आहेत. हे पाणी केवळ घरगुती वापरापुरते मर्यादित ठेवून, पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेर असलेल्या पारंपरिक विहिरींवरच गावकऱ्यांची भिस्त आहे. अशा विहिरी आदिवासींसाठी जीवनवाहिनी असल्या, तरी त्यांची साठवण क्षमता संपूर्ण गावाची तहान भागवण्याइतकी नाही. त्यामुळे प्रशासनाचा शुद्ध पाणीपुरवठ्याचा फुगा फुटला आहे.

Maharashtra TimesMaharashtra Heatwave: सूर्य कोपला! उष्णतेच्या लाटांचा राज्याला तडाखा, तब्बल 183 तालुक्यांत पारा 45 अंशांपार
पिण्याच्या पाण्याचा विसर
मेळघाटात सध्या जलसंधारणाच्या माध्यमातून पर्यटन आणि सुशोभीकरणाचे मोठे मनसुबे रचले जात आहेत. मात्र, हे करत असताना तिथल्या मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. एका बाजूला पर्यटन विकासाची चकचकीत स्वप्ने आणि दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण, अशी टोकाची विसंगती चिखलदरा आणि धारणी तालुक्यात पाहायला मिळत आहे.
Maharashtra TimesAdhik Maas : 7000 लीटर आमरस, 1 टन पुरण अन् 500 जावयांचा थाट; अधिकमास निमित्त भव्य ‘धोंड्याच्या जेवणाचा’ सोहळा
‘प्रगतिपथावर’च्या चक्रात कामे
‘ जलयुक्त शिवार अभियान २.० ’ अंतर्गत तब्बल ६१८ कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी ८ कोटी १२ लाखांचा निधीही वितरित करण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करून जलसंधारण करण्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु, चिखलदरा तालुक्यातील मडकी आणि कोहाणासारख्या अनेक गावांत सिमेंट नाला बांधकामे, कोल्हापुरी बंधाऱ्यांची स्थिती पाहता, हे प्रकल्प केवळ ‘मंजूर’ आणि ‘प्रगतिपथावर’ या सरकारी चक्रातच अडकल्याचे दिसते.

मंजूर कामे व निधी
भूजल सर्वेक्षण यंत्रणा- ६०३ कामे (५.१५ कोटी)
मृद व जलसंधारण (जि.प.)- ११ कामे (१.६९ कोटी)
मध्यम व लघु पाटबंधारे- ४ कामे (१.२८ कोटी)
एकूण- ६१८ कामे (८.१२ कोटी)

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा