Mehmood Slapped Rajesh Khanna : अभिनेते मेहमूद यांनी एकदा राजेश खन्ना यांच्या कानशिलात लगावलेली आणि तंबीही दिलेली. काय घडलेलं, जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मेहमूद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मेहमूद यांनी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. ते आपल्या विनोदी भूमिकांमुळे चर्चेत असायचे. पण, त्याचबरोबर राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांसोबतच्या त्यांच्या वादाचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.
बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात
मेहमूद यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात अशोक कुमार यांच्या ‘किस्मत’ या चित्रपटातून केली. १९४३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या वेळी ते नऊ वर्षांचे होते. मेहमूद यांनी दिग्दर्शक पी. एल. संतोषी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणूनही काम केलं होतं. नंतर त्यांनी गुरु दत्त यांच्या ‘प्यासा’ या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम केलं. Mahesh Tilekar : सियाचीनला ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी जवानांसाठी ‘मराठी तारका’ शो केला, महेश टिळेकरांनी सांगितला अनुभव
राजेश खन्ना यांना कानशिलात लगावली
मेहमूद यांनी १९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘जनता हवालदार’ या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांचं कास्टिंग केलेलं. या सिनेमात राजेश खन्ना यांच्यासोबत हेमा मालिनी मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटाचं शुटिंग मेहमूद यांच्या फार्महाऊसवर झालं होतं. एके दिवशी मेहमूद यांचा मुलगा सेटवर आला आणि निघून जाण्यापूर्वी त्यानं राजेश खन्ना यांना फक्त ‘हॅलो’ म्हटलं. ही गोष्ट राजेश खन्ना यांना अजिबात आवडली नाही.
नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत
यानंतर राजेश खन्ना सेटवर उशिरा येऊ लागले. मात्र, जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या, तेव्हा मेहमूद राजेश खन्ना यांच्यावर प्रचंड संतापले आणि त्यांनी सेटवरील सर्वांसमोर राजेश खन्ना यांच्या कानशिलात लगावली. राजेश खन्ना यांना कानशिलात लगावल्यानंतर मेहमूद म्हणाले, ‘तू तुझ्या स्वतःच्या घरात सुपरस्टार असशील. मी तुला चित्रपटासाठी पूर्ण रक्कम दिली आहे आणि तू तो पूर्ण केलाच पाहिजे.’ Shivani Rangole : ‘हिंदू की मुस्लीम, कोणत्या पक्षाला पाठिंबा देताय, हे सांगण्याची वेळ नाही’ NEET पेपरफुटीबद्दल शिवानी रांगोळे स्पष्टच बोलली दुसरीकडे, मेहमूद यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मतभेद झाले होते. मेहमूद यांनी स्वतःच यामागचं कारण सांगितलेलं. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, एकदा अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात आणलं होतं, तिथे मेहमूद यांना बायपास शस्त्रक्रियेसाठी आधीच दाखल करण्यात आलं होतं. मात्र, बिग बी मेहमूद यांना भेटले नाहीत. यामुळे मेहमूद आणि अमिताभ बच्चन यांच्यात मतभेद झाले.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा