Mehmood Son : मेहमूद यांचा मुलगा आणि मीना कुमारी यांचा भाचा आज सुप्रसिद्ध गायक असून त्याची तीन लग्न झालेली. मात्र, त्याची ही लग्न टिकली नाहीत. जाणून घेऊया या गायकाबद्दल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सगळेच लकी अली यांना त्यांच्या ‘ओ सनम’ या सदाबहार गाण्यामुळे ओळखतात. पण लकी अली त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. लकी अली यांची तीन लग्न झाली आहेत. तसेच ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीना कुमारी यांच्यासोबतही लकी अली यांचं कौटुंबिक नातं होतं. लकी अली यांची आई मधू कुमारीला महालिका म्हणूनही ओळखलं जातं, ती मीना कुमारी यांची बहीण होती आणि त्या दोघींचं नातं अतूट होतं. मीना लकी यांच्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करायच्या. लकी अली यांनी एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणानं भाष्य केलेलं.
तीन लग्नं आणि तीन घटस्फोट
लकी अली यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणानं सांगितलं. लकी यांचं पहिला लग्न मेगन जेन मॅकलिअरीसोबत झालं असून पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं आहेत. लकी अली यांचं दुसरं लग्न इनाया नावाच्या एका इराणी महिलेसोबत झालं, तिच्यापासूनही लकी यांना दोन मुलं आहेत. २०१० मध्ये, लकी यांनी ब्रिटिश मॉडेल राणी केट एलिझाबेथ हॅलमशी तिसरं लग्न केलं. तिसऱ्या पत्नीपासून लकी यांना एक मुलगा आहे. २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
Dharmendra :विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात, दोन लग्न होऊनही लोकप्रिय अभिनेत्रीसोबत अफेअर; धर्मेंद्र यांचं वैयक्तिक आयुष्य होतं चर्चेत लकी अली म्हणाले होते की, ‘तुम्ही एकाच जोडीदारासोबत आयुष्य काढाल असं नाहीये. मी तीन वेळा लग्न केलं, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या देशात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत. माझ्या वडिलांनीही भारताबाहेरील मुलीसोबत लग्न केलं होतं, त्यामुळे आमच्या घरातील वातावरण खूप पुढारलेलं होतं. माझी एकही लग्न यशस्वी झालं नाही, पण माझे सर्व रिलेशन अजूनही टिकून आहेत. आम्ही एकत्र राहत नाही, पण आम्ही नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे असतो. मी नेहमीच माझ्या मुलांची जबाबदारी घेतली आहे. मुलांचं संगोपन करण्याचा एकमेव खरा मार्ग म्हणजे प्रेम. मुलं आपल्या पालकांकडूनच शिकतात.’ नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये लकी अली यांनी लग्नाबद्दल भाष्य केलेलं.
लकी अली एका मुलाखतीत म्हणाले होते की, ‘एक काळ होता जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करायचो आणि गायचो, पण नंतर मला पुढे काय करावं हे सुचत नव्हतं. मला माझ्या स्वतःच्या शैलीत गायचं होतं आणि याच स्वातंत्र्याच्या शोधातून ‘ओ सनम’चा जन्म झाला. २०१५ मध्ये मी इंडस्ट्रीपासून दूर झालो. लोक मला वाईट वागणूक देत होते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर, मला वाटलं की, तिथे माझ्यासाठी काहीच उरलं नाही. माझे कोणी मित्रही नव्हते.’
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
‘मी ‘त्रिकाल’ आणि ‘भारत एक खोज’मध्ये श्याम बेनेगल यांच्यासोबत काम केलं आणि नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि ओम पुरी यांसारख्या कलाकारांकडून खूप काही शिकलो. अनेक वर्षांनंतर, मी पुन्हा गाण्याकडे वळलो. माझ्या लक्षात आलं की, जर माझी प्रतिभा खरी असेल, तर लोक माझं गाणं ऐकतील आणि नसेल तर ते मला नाकारतील.’ असंही लकी अली म्हणाले होते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा