Ajinkya Rahane on Sachin Tendulkar News :भारतीय संघाचा शांत, संयमी आणि भरवशाचा खेळाडू म्हणून ओळख मिळवलेल्या अजिंक्य रहाणे याने जुलै महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्तीनंतर पहिला फोन सचिनचा आल्याचं अजिंक्यने एका मुलाखतीत सांगितलं. सचिन त्याला काय बोलला जाणून घ्या.
Ajinkya Rahane on Sachin Tendulkar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. भारताचा संयमी, मेहनती आणि प्रामाणिक खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. अनेक दिवसांपासून तो संघाबाहेर होता, अजिंक्यने अनेक प्रयत्न केले पण त्याची काही निवड झाली नव्हती. शेवटी त्याने थांबण्याचा निर्णय घेतला. अशातच अजिंक्य रहाणे याने निवृत्ती घेतल्यावर पहिला फोन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा फोन आल्याचं सांगितलं. दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं? जाणून घ्या.
अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
पहिला फोन मला सचिन पाजीचा (सचिन तेंडुलकर) आला होता. पाजी बोलले की त्यांना वाटले की मी आणखी काही काळ खेळेल, पण मी त्यांना सांगितलं की मला आणखी लांबवू इच्छित नाही. कारण मी कोणत्याही पश्चातापाशिवाय निवृत्त होत आहे. इरफान पठाणचाही फोन आला होता. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांनी मला मेसेज केले होते. मी सर्वांना एकच गोष्ट सांगितलं की मी जेवढा खेळलो त्यामध्ये माझं सर्व दिलं आणि मी संतु्ष्ट असल्याचं अजिंक्य रहाणे म्हणाला.
West Indies Cricket : दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज अडचणीत, 2027 वनडे वर्ल्डकपमधील पात्रतेचा मार्ग कठीण! कारण काय? माझी संघामध्ये निवड झाल्यावर ड्रेसिंग रूमध्ये सुरूवातीचे पाच ते सहा महिने वरिष्ठ खेळाडू होते. यामध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि एम.एस. धोनी यांचा समावेश होता. या सर्व खेळाडूंना पाहून मी खूप काही शिकायचो. तेव्हाच्या संघातील खेळाडूंचे विचार फार जुळत होते, आक्रमक खेळण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. या खेळाडूंनंतर जेव्हा पुढील पीढी आली त्यांना सोबत घेऊन एक नवीन संघ तयार करायचा होत, त्यासाठी ड्रेसिंग रूमधील वातावरण उत्साही हवं होतं. खेळाडूंमध्ये कसलीही जळकी वृत्ती किंवा अहंकार नसायला हवा होता. खेळाडूंनी एकमेकांच्या प्रदर्शनाचे कौतुक करत एकजूट ठेवावी, असंही रहाणे म्हणाला.
Irfan Pathan : ‘तुझ्या आई-बापाने हेच शिकवलंय का?’; संगकारा इरफान पठाणवर का भडकला? 21 वर्षांनी वादाचं कारण समोर अजिंक्य रहाणे याने ३० जुलैला सकाळी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. सर्व क्रिकेट चाहत्यांना या बातमीने धक्का बसला होता. कारण अजिंक्यने संघात कमबॅक करण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवले होते, २०२३ नंतर तो संघातून बाहेर पडलेला. मात्र त्यानंतर त्याला कधीच कमबॅक करता आले नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये त्याने संघात जागा केली होती. आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना शानदार प्रदर्शनाच्या जोरावर त्याला संधी मिळालेली. भारताला फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.
अजिंक्य रहाणे कारकीर्द
दरम्यान, अजिंक्य रहाणे याने २०११ पासून २०१३ पर्यंत क्रिकेट खेळले होते. यामध्ये त्याने तिन्ही प्रकारात भारताचे प्रतिनिधित्त्व केले असून ८५ कसोटी,९० वनडे आणि २० टी-२० सामने खेळले होते. यामधील कसोटीत ५०७७ धावा, १२ शतके आणि २६ अर्धशतके. वनडेमध्ये २९६३ धावा, ३ शतके आणि २४ अर्धशतके आणि टी-२० मध्ये ३७५ धावा करताना १ अर्धशतक केले होते.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा