Headlines

Medha Manjrekar : ‘ट्रीपवरून आल्यावर टेस्ट केली, 8 महिन्यांपासून कॅन्सरचा प्रवास सुरू आहे’, आजारपणावर मेधा मांजरेकर यांची प्रतिक्रिया


Medha Manjrekar : मेधा मांजरेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या कॅन्सरच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे.

Medha Manjrekar On Her Journey Of Cancer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री आणि महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या कॅन्सरच्या आजारपणाबद्दल माहिती दिली. तसेच या कठीण काळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेल्यांचे आभार मानले. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरबद्दल भाष्य केलं आहे.

८ महिन्यांपासून कॅन्सरचा प्रवास

मुलाखतीदरम्यान मेधा मांजरेकर म्हणाल्या की, ‘खरं तर मी ती पोस्ट काही लोकांचे आभार मानायला केली होती. माझा गेले ८ महिने प्रवास सुरू आहे. कॅन्सर झालेली मी काही एकटी नाही. घरात माझ्या आईला कॅन्सर झालेलं मी बघितलं आहे. महेशलाही झाला होता. बाहेरही किती जण आहेत ज्यांना कॅन्सर झालाय. मला पहिल्यांदा कळलं तेव्हा मला खरंच काही वाटलं नाही. यामध्ये जे चांगलं करता येईल ते करायचं. हल्ली सायन्स एवढं पुढे गेलंय. उपचार चांगले आहेत. किमोथेरपी बऱ्यापैकी सोपी झाली आहे. १०-१५ वर्षांपूर्वी त्रास व्हायचा तितका त्रास नाही होत. त्रास होतोच पण आता काही गोष्टी सहज झाल्या आहेत.’

Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली

मेधा मांजरेकर पुढे म्हणाल्या की, ‘मी माझी एक ट्रिप प्लॅन केली होती. मला जेव्हा वाटलं की आपल्याला ही टेस्ट करायला जायचंय, तेव्हा मी म्हटलं की १० दिवसांनी केली तरी हरकत नाही. आधी ट्रिप करुन येते. त्यामुळे मी ट्रिपला गेले आणि दुसऱ्यादिवशी परत आल्यानंतर मी टेस्ट केल्या. मग हा प्रवास सुरू झाला. ही टेस्ट मी स्वत:च जाऊन केली. मला कळलं की, पुढच्या टेस्ट कराव्या लागतील. तेव्हा मग घरी आल्यावर मी महेशला याबद्दल सांगितलं. महेश स्वत: खूप पॉझिटिव्ह आहे. त्याच्या कॅन्सरवेळीही तो असाच पॉझिटिव्ह होता. महेश बरा झाला. माझी आईही बरी झाली. मी पण बरी होईन.’

Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra : लॉर्ड शार्दुल ठाकूरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची भुरळ, क्रिकेटरनं केलं समीर चौघुलेंचं कौतुक
‘मी रोजचं भाजी भाकरी खाते त्यात खूश असते. मला जो कॅन्सर झाला तो अनुवांशिक होता. कारण आईला कॅन्सर झाला होता. त्याला कोण काय करणार? काही गोष्टी स्वीकारणं आणि पुढे जाणं, त्यातून कसं बाहेर येऊ शकतो ते पाहणं. जे हातात आहे ते करायचं आणि जे हातात नाही ते स्वीकारायचं.’
Maharashtra TimesUjjwal Nikam : ‘अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील वादसुद्धा त्यांच्या मृत्यूचं कारण’, गुलशन कुमार मृत्यूप्रकरणी काय म्हणाले उज्ज्वल निकम?
‘मला किमोचा त्रास व्हायचा तेव्हाही मी हेच स्वतःला सांगायचे की आपण खूप नशिबवान आहोत. कारण माझ्याजवळ इतकी प्रेम करणारी माणसं आहेत. त्यांच्यासाठीच मी ती खास पोस्ट लिहिली. काही जण मला रोज देवाचे फोटो पाठवायचे. माझ्या मुलींनी मला सपोर्ट केलं. कॅन्सर म्हटलं की, आपण घाबरुन जातो. त्या शब्दालाच आपण घाबरतो. पण मी सगळ्यांना हेच सांगेन की घाबरू नका. कारण उपचार चांगले आहेत. याच्याशी लढा तर द्यावाच लागेल कारण कॅन्सरपेक्षा कॅन्सरचे उपचार जास्त वेदनादायी आहेत. पण त्यातून जायचं असं ठरवलं की सगळं होतं.’ असंही मेधा यांनी शेवटी सांगितलं. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मेधा मांजरेकर बोलत होत्या.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा