ठाण्यात मंगळवारी झाड कोसळल्याची घटना घडली. तसेच मुंबईतही शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर ठाणे महापालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : मुंबईच्या चेंबूर परिसरात मंगळवारी शाळेच्या बसवर झाड कोसळून शाळकरी विद्यार्थ्यांच्या दुर्देवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने खबरदारीचे उपाय तातडीने हाती घेतले आहेत. ठाण्यातही झाड कोसळून पादचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत पादचारी जखमी झाला आहे. या दोन्ही घटनांची गंभीर दखल महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतली. त्यांनी बुधवारी दालनात वृक्षप्राधिकरण विभागाची बैठक घेऊन शहरातील धोकादायक झाडांचे सर्वंकष सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. धोकादायक, वाळलेली अथवा कललेली झाडे व मोठ्या फांद्या तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून हटवाव्यात, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.
ठाणे शहरातील शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, प्रमुख रहदारीचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या परिसरातील झाडांची विशेष तपासणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे, त्या ठिकाणीही पुन्हा सर्वेक्षण करून झाडांची स्थिती सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करण्याचे निर्देश महापौर पिंपळोलकर यांनी दिले.
महापौरांचे महत्त्वाचे आदेश
यावेळी रस्त्यांच्या कडेला छाटणी करून ठेवलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने उचलण्याचे आदेशही महापौरांनी दिले. पावसाळ्यात अशा फांद्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे छाटणी झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी फांद्या पडून राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वागळे इस्टेटमध्ये महाकाय वृक्ष कोसळून पादचारी जखमी
पावसाने जोर पकडून आठवडा उलटत नाही तोच ठाण्यात दररोज वृक्ष आणि फांद्या कोसळून वाहनांच्या नुकसानीचे प्रकार समोर आले आहेत. मंगळवारी सकाळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याजवळ प्रशांत कॉर्नरच्या बाजूला महाकाय वृक्ष कोसळून एक बस, एक टेम्पो, दोन कार, एक तीन चाकी आणि सहा दुचाकी अशा एकूण 11 वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या पडझडीत कामावर जाणाऱ्या पादचाऱ्याला दुखापत झाली.
पादचाऱ्याच्या डोके आणि छातीला दुखापत
या झाडामुळे बॉम्ब शोधक पथक, खासगी वाहनांचे नुकसान झाले. यावेळी ज्ञानेश्वर नगर येथील साईधाम सोसायटीत राहणारे पवन झा (वय५२) कामावर जात होते. त्यांच्या अंगावर झाड पडले. त्यामुळे झा यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा