Headlines

Marathi Celebs divorces: मराठी सिनेविश्वातील धक्कादायक घटस्फोट


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सिनेसृष्टीतील लोकप्रिय स्टार कपल आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांनी अधिकृतपणे आपल्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगत होत्या, ज्यावर या जोडप्याने अखेर सोशल मीडिया पोस्टद्वारे पूर्णविराम दिला.

Marathi Celebs divorces
आदिनाथ आणि उर्मिला यांनी अत्यंत समजूतदारपणे आणि परस्पर संमतीनं वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही दोघांनी परस्पर संमतीने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा हा प्रवास इथेच संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र राहू. तिचे सहपालकत्व आम्ही पूर्ण जबाबदारीने निभावणार आहोत.या धक्कादायक घोषणेनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला असला तरी, त्यांनी या जोडप्याच्या प्रायव्हसीचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे.

अभिनेत्री मानसी नाईक

अभिनेत्री मानसी नाईक

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईकचं जानेवारी २०२१ मध्ये लग्न झालं. मानसीनं बॉक्सर प्रदीप खरेरा सोबत लग्नगाठ बांधली होती. थाटामाटात त्या दोघांचा विवाह पार पडला होता. हळद, मेहंदी आणि लग्न असा तीन दिवसांचा सोहळाच साजरा करण्यात आला होता. मात्र लग्नाच्या वर्षभरानंतर तिनं वेगळं व्हायचा निर्णय घेतला.पतीपासून वेगळं झाल्यानंतर तिनं पती प्रदीप खरेरा याच्यावर अनेक आरोप केले आहेत. लॉकडाउन दरम्यान ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलापण . त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री स्नेहा वाघ आणि अभिनेता आविष्कार दारव्हेकर

अभिनेत्री स्नेहा वाघ आणि अभिनेता आविष्कार दारव्हेकर

मराठी सिनेमाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघ देखील अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आली. सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर तिचं लग्न अभिनेता आविष्कार दारव्हेकरसोबत झालं होतं. मात्र काहीच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्यानंतर स्नेहानं आरोप केला होता की लग्नानंतर आविष्कारनं तिचं मानसिक, शारीरिक शोषण केलं आणि त्यामुळंच तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

गायक राहुल देशपांडे

गायक राहुल देशपांडे

आपल्या सुमधूर आवाजानं आणि शास्त्रीय संगीताच्या जादूने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले होते. लग्नाच्या तब्बल १७ वर्षांनंतर राहुल देशपांडे आणि त्यांची पत्नी नेहा देशपांडे यांनी परस्पर संमतीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला . राहुल यांनी स्वतः सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना या निर्णयाची माहिती दिली होती.

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते

गेल्या काही काळापासून अभिनेत्री शुभांगी सदावर्तेही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळंही सोशल मीडियावर बरीच चर्चेत राहिली .२०२० मध्ये करोना काळात शुभांगीनं संगीतकार आनंद ओक यांच्याशी विवाह केला होता. मात्र, काही कारणांमुळं त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतल्याचं सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं. या कठीण काळानंतर शुभांगीने आपल्या आयुष्याची नवी सकारात्मक सुरुवात केली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये तिनं सुमित म्हशीलकर यांच्यासोबत अत्यंत साधेपणाने विवाहबंधनात अडकून नव्या संसाराला सुरुवात केली आहे.

अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण

अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण

अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण या स्टार कपलच्या घटस्फोटाचीही बरीच चर्चा झाली. स्नेहानं अनिकेत आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केल्यानं एकच खळबळ उडाली होती.
स्नेहानं अनिकेतच्या कुटुंबावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप केले होते. सोबतच ते आपल्याला कामासाठी बाहेर जाऊ देत नसल्याचं म्हटलं होतं. आपण अनिकेतपेक्षा जास्त पैसे कमावतो म्हणून हा छळ केला जात असल्याचं तिने तक्रारीत लिहिलं होतं. आता काही महिन्यांपूर्वीच तिनं दुसऱ्यांदा संसार थाटला.