Mallika Sherawat The Traitors 2 Video : अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच द ट्रेटर्स या करण जोहरच्या शोमध्ये दिसणार आहे. .या शोचा प्रोमो समोर आला असून मल्लिका हॉलिवूड स्टारबद्दल वक्तव्य करताना दिसते.

व्हिडिओमध्ये, शोमधील कुल्लू या नावाने ओळखला जाणारा कॉमेडीयन आदित्य कुलश्रेष्ठ मल्लिकाला विचारतो की, तिला कधी कोणावर ‘क्रश’ झाले आहे का? की नेहमी इतर लोकच तुझ्या प्रेमात पडतात.
“आजकाल टॉम क्रूझला माझ्याबद्दल आकर्षण वाटतंय.”
यावर मल्लिकाने दिलेले उत्तर ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. ती म्हणाली, “प्रत्येकालाच माझ्याबद्दल आकर्षण वाटतं. सध्या टॉम क्रूझलाही माझ्याबद्दल तसं वाटतंय. मी अजिबात खोटं बोलत नाहीये; जर माझ्याकडे माझा फोन असता, तर मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ नक्कीच दाखवले असते.”
“आम्ही एकत्र पार्टी करत असतानाचे फोटो आहेत.”
त्यानंतर कुल्लू आणि अभिषेक मल्हान तिला विचारतात, “तो कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाठवत असतो? तो फोटो पाठवतो का?” यावर मल्लिका उत्तर देते, “नाही, आम्ही एकत्र पार्टी करत असतानाचे ते फोटो आहेत. जे खूप छान आहेत.”
उर्वशी रौतेलाच वारं घुसलं का? मल्लिका ट्रोल
मल्लिकाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने लिहिले, “हे ऐकायला एखाद्या जोकसारखे वाटते, पण ती खरेच सांगतेय.” दुसऱ्या एकाने कमेंट केली, “हाहा! काय जोक आहे!” आणखी एका युजरने लिहिले, “तिच्यात ‘उर्वशी रौतेलाचे वारं घुसलं आहे.” तर एका चाहत्याने म्हटले, “मला खात्री आहे की ती खरोखरच अशीच आहे.”
रिअॅलिटी शो करण्याबाबत मल्लिका साशंक
यापूर्वी ‘टाइम्स एंटरटेनमेंट’शी बोलताना मल्लिकाने सांगितले होते की, सुरुवातीला तिला The Traitors या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यात अजिबात रस नव्हता. ती म्हणाली, “सुरुवातीला ‘द ट्रेटर्स’बद्दल माझ्या मनात खूप शंका होत्या. मला रिअॅलिटी शो करायचा नव्हता. एक अभिनेत्री म्हणून मला त्यात काहीच रस नव्हता, पण नंतर अंकिताने (अँथनी, तिची मॅनेजर) मला त्यासाठी तयार केले. ती म्हणाली, ‘फक्त एकदा तो शो बघ. जर पहिला सीझन पाहिल्यानंतर तुला तो आवडला नाही, तर आपण नकार देऊ, पण न पाहताच तो नाकारू नकोस.’ मी तो शो पाहिला आणि मला तो खूप आवडला.”
‘द ट्रेटर्स’ हा खेळ नक्की काय आहे?
‘द ट्रेटर्स’मध्ये सर्व स्पर्धक एकाच ठिकाणी राहतात, परंतु त्यांची गुप्तपणे ‘ट्रेटर्स’ आणि ‘इनोसंट्स’ या दोन गटांत विभागणी केली जाते. पकडले न जाता इतर खेळाडूंना खेळाबाहेर काढणे हे ‘ट्रेटर्स’चे उद्दिष्ट असते. दुसरीकडे, ‘इनोसंट’ खेळाडू आपला समजूतदारपणा, रणनीती आणि युती यांच्या आधारे ‘ट्रेटर्स’ना ओळखण्याचा प्रयत्न करतात. मानसशास्त्रीय खेळ, फसवणूक, विश्वास आणि रणनीती हे या शोचे मुख्य घटक आहेत. पहिल्या पर्वाचे विजेते उर्फी जावेद आणि निकिता लुथर झाले होते.
21 स्पर्धकांसह दुसऱा सीझन सुरू
करण जोहरच्या सूत्रसंचालनासह ‘द ट्रेटर्स’चे दुसरे पर्व अधिकच रंजक ठरेल अशी अनेकांची अपेक्षा आहे. यावेळी एकूण 21 स्पर्धक सहभागी होणार असून, या शोमध्ये रणनीती, मैत्री आणि युती यांचा एक वेगळाच खेळ पाहायला मिळेल.
‘द ट्रेटर्स २’ मध्ये कोण सहभागी होत आहे?
या शोमधील निश्चित झालेल्या स्पर्धकांमध्ये मल्लिका शेरावत, मुनव्वर फारुकी, श्वेता तिवारी, रिया चक्रवर्ती, अभिषेक मल्हान, क्रिस्टल डिसूझा, पारुल गुलाटी, दिलीप ताहिल, शाहनील गिल, शालिनी पासी, रणवीर ब्रार, आदित्य कुलश्रेष्ठ, हरमन बावेजा, प्रिश, रिडा थराणा, सौंदस मौफाकिर आणि रॅपर इक्का यांचा समावेश आहे. ‘द ट्रेटर्स 2’ हा शो 13 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडिओवर सुरू होईल.

