Maharashtra State Cabinet Decision Oral Transfer Orders in Mantralaya cancelled; मंत्रालयात तोंडी नियुक्त्यांना लगाम, नियमबाह्य नेमणुका रद्द करण्याचा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, वेतन बंद करण्याचा इशारा
Maharashtra State Cabinet Decision Oral Transfer Orders in Mantralaya cancelled; मंत्रालयात तोंडी नियुक्त्यांना लगाम, नियमबाह्य नेमणुका रद्द करण्याचा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, वेतन बंद करण्याचा इशारा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मंत्रालयातील कामकाज अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रशासकीय नियमांनुसार चालावे, यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उसनवारी आणि मौखिक तत्त्वावरील नियुक्त्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मंत्रालयातील मंत्री कार्यालये आणि विविध विभागांमध्ये नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या नियुक्त्या तत्काळ रद्द करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कार्यालयात परत पाठविण्याचे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केलेल्या शासन परिपत्रकात मंत्रालयातील मनुष्यबळ व्यवस्थापनाबाबत सविस्तर निर्देश दिले आहेत. मंत्रालय हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्रशासकीय कार्यालय असल्याने येथील कामकाज कायदेशीर, पारदर्शक आणि प्रस्थापित नियमांच्या चौकटीत होणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. योग्य मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास शासनाच्या लोकाभिमुख योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते. मात्र, मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास त्याचा थेट परिणाम शासकीय कामकाजावर होतो, असे शासनाने नमूद केले आहे.
शासन निर्णयानुसार मंत्रिपरिषदेच्या सदस्यांना अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देणे, विविध विभागांमध्ये प्रतिनियुक्त्या करणे तसेच करार पद्धतीने निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी निश्चित कार्यपद्धती आहे. मात्र, या कार्यपद्धतीचे पालन न करता मंत्री व मंत्रालयीन विभागांमध्ये बाहेरील कार्यालयांतून प्रतिनियुक्तीवर, उसनवारीवर, मौखिक आदेशाने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
मंत्रालय प्रवेशपत्र रद्द होणार
नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या रद्द झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मंत्रालयीन प्रवेशपत्र, फेस रीडिंग आणि उपस्थितीची सुविधा तत्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नियुक्ती रद्द झाल्यानंतर संबंधितांना मंत्रालयात प्रवेश करता येणार नाही.
मंत्रालयातील मंत्री कार्यालये आणि मंत्रालयीन विभागांमध्ये कार्यरत असलेल्या उसनवारी, मौखिक तत्त्वावरील नियुक्त्या तत्काळ रद्द करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कार्यालयात परत पाठविण्याची कार्यवाही १० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल संबंधित मंत्रालयीन विभागांनी १५ सप्टेंबरपर्यंत सादर करायचा आहे. संबंधित कर्मचारी मूळ कार्यालयात रुजू न झाल्यास त्यांचे वेतन बंद करण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
सदस्यांना अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देणे, विविध विभागांमध्ये प्रतिनियुक्त्या करणे तसेच करार पद्धतीने निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी निश्चित कार्यपद्धती आहे. मात्र, या कार्यपद्धतीचे पालन न करता मंत्री व मंत्रालयीन विभागांमध्ये बाहेरील कार्यालयांतून प्रतिनियुक्तीवर, उसनवारीवर किंवा केवळ मौखिक आदेशाच्या आधारे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
विशेष म्हणजे डॉक्टर, लघुलेखक, शिक्षक, अभियंते आदी तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणावर नियुक्ती झाल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्रालयीन कामकाजाचा आवश्यक अनुभव किंवा प्रशिक्षण नसल्याने प्रशासकीय कार्यप्रणालीत अडथळे निर्माण होतात. उसनवारी किंवा मौखिक तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे संबंधित मूळ विभागातील पदे रिक्त राहण्याची समस्या निर्माण होते. शिवाय, मूळ विभागाने दिलेले प्रशिक्षणही अशा परिस्थितीत वाया जाते, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा