![]()
Nashik Crime : गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’
प्रेम व्यक्त करण्याचे आणि प्रेयसीचा रुसवा घालवण्याचे प्रत्येकाचे फंडे वेगळे असतात. कुणी गुलाबाचे फूल देतो, तर कुणी खास सरप्राइज ‘प्लॅन’ करतो. मात्र, नाशिकमधील एका तरुणाने प्रेयसीची माफी मागण्यासाठी असा काही धाडसी मार्ग निवडला की, प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. एका कॉलेजसमोर लावलेला ‘सॉरी’चा बॅनर चांगलाच चर्चेत आला असून, पोलिसांनी प्रियकरासह बॅनर छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस मालकावर कारवाई केली आहे.
