Headlines

Maharashtra Live News 20th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर




Marathi Live News: राजकीय नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेऊन शैक्षणिक जबाबदारी निश्चितीचा मुद्दा संसदेत मांडण्याचे आश्वासन दिले तर ते आज, सोमवारी उपोषण सोडतील, अशी माहिती त्यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी रविवारी दिली. त्यामुळे उपोषणाबाबत वांगचुक यांनी नरमाईची भूमिका घेतली असली तरी आज, सोमवारच्या मोर्चावर ठाम राहत हा मोर्चा यशस्वी करा, असे आवाहन त्यांनी केले. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि वैद्यकीय संघटनांनी आज, सोमवारी रोजी पुकारलेला राज्यव्यापी बंद मागे घेतला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘आयएमए’ने सांगितले. यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधा सुरू राहणार आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत