Headlines

Maharashtra Govt to Host Festivals at 12 UNESCO World Heritage Forts


युनेस्कोच्या जागतिक वरसा यादीत महाराष्ट्रातील 12 किल्ले समाविष्ट केल्याने ही शिवप्रेमींसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर आजा राज्य सरकारकडून या सर्व किल्ल्यांवर ‘गडकिल्ले महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे.

Raigad News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांवर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत भव्य ‘गडकिल्ले महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा जागतिक गौरव साजरा करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमासाठी राज्य शासनाने 60 लाख रुपयांच्या खर्चास वित्तीय मान्यता दिली आहे. प्रत्येक किल्ल्यासाठी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वारसा पर्यटनाला नवे बळ मिळणार असून शिवकालीन इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार होण्यास मदत होणार आहे.

मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे रायगड, शिवनेरी, खांदेरी, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जिंजी, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग आणि राजगड या 12 किल्ल्यांचा नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. या ऐतिहासिक सन्मानानंतर या दुर्गांचे महत्त्व देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविणे आणि दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने राज्य शासनाने गडकिल्ले महोत्सव आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महोत्सांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होणार

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी केला आहे. या महोत्सवांमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध लोककला प्रकार, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, शिवकालीन इतिहासावर आधारित नाट्यप्रयोग, व्याख्याने, दुर्गसंवर्धन विषयक उपक्रम, ऐतिहासिक प्रदर्शने तसेच किल्ल्यांचा इतिहास उलगडणारे माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना केवळ ऐतिहासिक वास्तूंचे दर्शनच नव्हे, तर शिवकालीन वारशाचा जिवंत अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळणार

या उपक्रमाचा विशेष लाभ रायगड जिल्ह्याला होणार आहे. राज्याची राजधानी राहिलेल्या रायगड किल्ल्यासह खांदेरी किल्ल्यावर विशेष सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. याशिवाय सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या सागरी किल्ल्यांवर तसेच रत्नागिरीतील सुवर्णदुर्गावरही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळेल, तर पर्यटन, हॉटेल व्यवसाय, स्थानिक हस्तकला आणि अन्य पूरक व्यवसायांनाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिवरायांचा पराक्रम जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न

युनेस्कोच्या मानांकनानंतर महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. आता गडकिल्ले महोत्सवाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक वारसा अधिक व्यापक स्वरूपात देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. इतिहास, संस्कृती आणि पर्यटन यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे वारसा संवर्धनाला गती मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि शिवरायांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा