Maharashtra Former CM Vasantrao Naik Grandson Yayati Naik joins BJP; माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा भाजपात प्रवेश, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, समीकरण कसे बदलणार?
Maharashtra Former CM Vasantrao Naik Grandson Yayati Naik joins BJP; माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा भाजपात प्रवेश, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, समीकरण कसे बदलणार?
Maharashtra Politics : महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यापूर्वीच ययाती नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने किमान पुसद परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं आहेत
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
यवतमाळ : महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील प्रतिष्ठित, राजकीय घराणे अर्थात नाईक कुटुंबाचे वंशज ययाती नाईक यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. दिल्लीत एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ययाती हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आहेत.
ययाती नाईक यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात हा पक्षप्रवेश केला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात, विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
कोण आहेत ययाती नाईक?
ययाती नाईक हे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे नातू, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आणि विद्यमान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. Indraneel Naik : सलग ७२ वर्ष एकाच कुटुंबाचं एका मतदारसंघावर वर्चस्व, दोन मुख्यमंत्री दोन मंत्री, आताही रेकॉर्डब्रेक विजय भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांच्या हस्ते ययाती नाईक यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ. अरविंद मेनन, राज्यसभा सदस्य सुधांशू त्रिवेदी आणि राष्ट्रीय कार्यालय अधीक्षक सर्वेद्र सिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. या पक्षप्रवेशावेळी उपस्थित नेत्यांनी ययाती नाईक यांचे पक्षात स्वागत करून अभिनंदन केले. Mangesh Kashikar : शिवसेना शहरप्रमुखाच्या हॉटेलवर धाड, पोलीसही चक्रावले, मंगेश काशीकरांवर गुन्हा दाखल ययाती नाईक यांच्यासारखा मोठा राजकीय वारसा असलेला तरुण नेता भाजपमध्ये आल्याने महाराष्ट्रात पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. ययाती नाईकांच्या प्रवेशामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर होण्याची चिन्हे आहेत.
भाजप-राष्ट्रवादीने दिली काँग्रेसला साथ; हणमंत पाटील बेटमोगरेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध
ययाती नाईक
महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यापूर्वीच ययाती नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने किमान पुसद परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं आहेत. या प्रवेशामुळे भाजपला पुसद विभागात निवडणूक लढणे सोपे होईल, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा