‘महाराष्ट्र टाइम्स’ने राज्यातील विविध भागांतील अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला असता त्यांनी या तक्रारी मांडल्या. मुंबईसह राज्यातील विविध भागांतील अंगणवाडी सेविकांच्या म्हणण्यानुसार, मागील सहा-सात वर्षांपासून तांदूळ, डाळ, खिचडी, शिरा आदी आहाराबाबत तक्रारी आहेत. वास येणारी खिचडी, कमी साखरेचा बेचव शिरा आणि निकृष्ट दर्जाचे अन्न लाभार्थी नाकारतात. गर्भावस्थेत असा आहार घेतल्यास आरोग्याला धोका निर्माण होईल का, अशी शंका लाभार्थ्यांकडून उपस्थित केली जाते; तरीही हा आहार घेतलेल्या लाभार्थ्यांची छायाचित्रे घेऊन माहिती कळवण्याची जबरदस्ती प्रकल्प अधिकाऱ्यांकडून केली जाते. अन्न निकृष्ट दर्जाचे असेल, तर ते घेण्यासाठी लाभार्थ्यांवर दबाव कसा आणणार, असा प्रतिप्रश्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे.
लोकांना त्रास दिलात ना? भोगा आता! तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई; हाय कोर्टानं हॉटेलला सुनावलंग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका आहार शिजवून देतात आणि शहरी भागामध्ये बचतगटांच्या माध्यमातून तयार आहार दिला जातो. आहाराचे दर २०१८मध्ये प्रती लाभार्थी आठ रुपये असे ठरवण्यात आले होते. त्यातील ६५ पैसे आहार शिजवण्यासाठी इंधनखर्च येतो. हे पाहता प्रति लाभार्थी आहार सात रुपये ३५ पैसे या दराने दिला जातो. त्यात कोणत्या गुणवत्तेचा आहार मिळणार? महाराष्ट्रात मुले आणि महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना योग्य प्रमाणात पोषण आहार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, सध्याच्या दरात आणि पुरवठा व्यवस्थेत त्याची पूर्तता होते का, याची चाचपणी होणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीचे सचिव राजेश सिंग यांनी सांगितले.
Ganeshotsav 2026: देवाक काळजी रे! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा, एसटीच्या ‘ग्रुप बुकिंग’चे अतिरिक्त शुल्क रद्दसाडेसात रुपयांत काय देणार ?
सध्याच्या घडीला चहासाठी १० रुपये आणि वडापावसाठी २५ रुपये मोजावे लागत असताना साडेसात रुपयांत काय गुणवत्तेचा आहार देणार, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे.
चेहरा पडताळणीमध्ये त्रुटी
लाभाथ्यांच्या चेहरा पडताळणीतील अडचणीही अजून सुटलेल्या नाहीत. अनेक भागांत मोबाइल नेटवर्क नसणे, रेंजची समस्या, गर्भावस्थेत आणि प्रसूतीनंतर चेहरा पडताळणी न होणे, अशा अडचणी सेविकांना भेडसावत आहेत. त्यामुळे नोंदी पूर्ण करताना सेविकांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

