LTCG Tax on Equities: शेअर बाजारातील दीर्घकालीन भांडवली नफा कर हटवण्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती, पण आता सरकारने LTCG रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.शेअर बाजारातील कमाईवरील 12.5% दीर्घकालीन भांडवली नफा कर हटवण्याची मागणी सतत केली जात असून LTCG मुळे सरकारच्या तिजोरीत अब्जावधी रुपयांची भर पडत आहे.

सरकार LTCG कर रद्द करणार?
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अर्थसंकल्पीय आणि कायदेशीर बदलांद्वारे कर दरांचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. पण सध्या LTCG रद्द करण्याची कोणतीही योजना नाही.
Property Rules: जमीन, मालमत्तेच्या वादात पोलीस कारवाई बेकायदा कशी? तुमचे हक्क काय? यावर काय सांगतो कायदा जाणून घ्या
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर दोन प्रकारचे टॅक्स आकारले जातात. पहिला दीर्घकालीन भांडवली नफा कर , जो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवलेल्या आणि नंतर विकलेल्या शेअर्स किंवा फंडांवर लागू होतो. तर अल्पकालीन भांडवली नफा कर 12 महिन्यांपेक्षा कमी काळ ठेवलेल्या शेअर्सवर लागू होतो. तसेच एका आर्थिक वर्षात तुम्हाला 1.25 लाख रुपयांपर्यंत नफा झाला असेल तर, हा कर देय नाही.
LTCG रद्द केल्याने सामान्य गुंतवणूकदाराला काय फायदा?
इक्विटीवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर 2004 मध्ये रद्द करण्यात आला होता पण, फेब्रुवारी 2018 मध्ये पुन्हा लागू केला गेला आणि एप्रिल 2018 पासून प्रभावी आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून LTCG करण्याची मागणी केली जात असून यामुळे नफ्यात लक्षणीय घट होत असल्याचे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. म्हणजे समजा एखाद्याने एका शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि एका वर्षानंतर विकून 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला, तर 1.25 लाखांपर्यंत रकमेवर LTCG सूट दिली जाते.
Restaurant Service Charge: ग्राहकांकडून सरसकट वसूल करता येणार नाही सेवाशुल्क! 41 रेस्तरॉवर कारवाईचा बडगा, तक्रार कुठे करायची ते समजून घ्या
अशाप्रकारे, उर्वरित 1.75 लाखांवर 12.5% दराने कर आकारला जाईल, जो की 21,875 रुपये होईल. म्हणजे, एकूण नेट नफा 2,76,125 रुपयेपर्यंत कमी होईल आणि LTCG काढून टाकला, तर कमाईचा मोठा हिस्सा वाचेल.
LTCG मुळे सरकारच्या तिजोरीत खळखळाट
सरकारला मिळणारा भरीव महसूल दीर्घकालीन भांडवली नफा कर न हटवण्यामागे सर्वात मोठे कारण आहे. 2024-25 या मूल्यांकन वर्षात LTCG करातून सरकारी तिजोरीत 72,289 कोटी रुपये जमा झाले, तर मूल्यांकन वर्ष 26 मध्ये सरकारने LTCG करातून 1,29,158 कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे, दोन वर्षांत सरकारने बाजारातील गुंतवणूकदारांकडून LTCG मधून 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.
…तर शेअर बाजारात मोठी तेजी येईल?
गेल्या एका वर्षात हा मुद्दा पुन्हा समोर आला असून या काळात देशांतर्गत बाजार निर्देशांकांनी उच्चांकी उभारी घेतली आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. LTCG दर कमी केल्याने किंवा सवलतीची मर्यादा वाढवल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळू शकते आणि बाजारातील भावना सुधारू शकते ज्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक तेजी येईल, असे अनेक गुंतवणूकदार आणि बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण सरकारच्या भूमिकेने अपेक्षांना वारंवार सुरुंग लावला.

