या तेल कंपन्यांना देण्यात आली मोठी जबाबदारी
देशातील महत्वाच्या तेल कंपन्यांना भारत सरकारकडून एलपीजी निर्मितीची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रिलायन्सकडे सगळ्यात मोठी जबाबदारी देण्यात आली असून कंपनीला दर दिवशी 18,000 टन एलपीजी उत्पादन करावे लागणार आहे. त्याखाली नायरा एनर्जीला 4,480 टन पर डे एलपीजी प्रोडक्शनचे टार्गेट देण्यात आले आहे. तर ओएनजीसी आणि GAIL या कंपन्यांना दिवसाला 6,460 टन एलपीजी गॅस निर्मितीचे लक्ष देण्यात आले आहे. अशा 21 तेल कंपन्यांना भारत सरकारने एलपीजी गॅस निर्मितीचे दैनंदिन लक्ष्य ठरवून दिले आहे. या कंपन्यांमध्ये खाजगी तसेच सरकारी दोन्ही प्रकारच्या कंपन्यांचा समावेश आहे.
भारत एलपीजी उत्पादनावर इतका भर का देत आहे?
सध्या पश्चिम भारतात तणावाचे वातावरण आहे. त्यात आखाती देश भारताचे सगळ्यात मोठे एलपीजी आयातदार आहेत. Strait Of Hormuz या सागरी महामार्गावर अडथळे वाढण्याचे चित्र दिसून येत आहेत. याच सागरी महामार्गातून आखाती देशातील व्यापार चालतात, जर हा व्यापरमार्ग वाढत्या तणावामुळे भविष्यात बंद झाला तर भारताला कच्चा तेल मिळणे कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे ठप्पही होऊ शकते. या सगळ्या बाबी लक्षात घेत भारताने एलपीजी Backup तयार करण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी देशातील महत्वाच्या तेल कंपन्यांना एलपीजी प्रोडक्शनचे लक्ष देण्यात आले आहे. जर भविष्यात एलपीजी संदर्भात काही आपत्कालीन परिस्थिति उद्भवली तर भारताकडे देशांतर्गत एलपीजी साठा आधीच तयार झालेला असेल.
भविष्यात गरज भासल्यास एलपीजीचे उत्पादन आणखीन वाढवले जाईल. विशेष म्हणजे भारताने आता भविष्यासाठी वाढवलेले एलपीजीचे उत्पादन लक्ष्य हे आधीच यंदाच्या अर्थव्यवस्थेत ठरवण्यात आलेल्या उत्पादनापेक्षा दुप्पट आहे. भारताने एलपीजी गॅससाठी आखाती देशांवर अवलंबून राहणे कमी केले असून अमेरिका भारताचा सगळ्यात मोठा LPG आयातदार बनला आहे.
सामान्य नागरिकांच्या एलपीजी वितरणविषयीही कडक निर्बंध
8th Pay Commission : आयोगात 3.833 फिटमेंट फॅक्टरची चर्चा, जर लागू झाले तर कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन किती? समजून घ्या पूर्ण गणितआता सामान्य नागरिकांना एलपीजी बूक करताना काही काळाचा गॅप घ्यावा लागणार आहे. गावाकडच्या ग्राहकांनी जर आधीच एखादा एलपीजी गॅस सिलेंडर बूक केला असेल तर पुढच्या बूकिंगसाठी किमान 45 दिवस थांबावे लागणार आहे तर शहरातील ग्राहकांना 25 दिवसांची मर्यादा देण्यात आली आहे. जर एका ग्राहकाकडे एकापेक्षा जास्त एलपीजी कनेक्शन असतील तर एक कनेक्शनसोडून इतर कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे. एक ग्राहकाला फक्त एकच एलपीजी कनेक्शन ठेवता येणार आहे.

