Headlines

Love sparks on snapchat 19 year old girl travels from odisha to maharashtra for boyfriend; स्नॅपचॅटवर प्रेम जुळलं; तरुणी प्रियकरासाठी थेट महाराष्ट्रात आली; नंतर नातेवाईकही पोलिसांसह धडकले, पण एका गोष्टीने डाव पलटला


छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटवर झालेली ओळख आधी प्रेमात बदलली आणि नंतर त्या प्रेमासाठी एका १९ वर्षीय तरुणाने थेट ओडिसा राज्य गाठल्याची एक आगळीवेगळी आणि नाट्यमय घटना समोर आली आहे. ओडिसातील संबलपूर येथील १८ वर्षीय तरुणीला सोबत घेऊन तो आपल्या गावी परतला होता. तरुणीने स्वतःच्या इच्छेने आल्याचे नोटरीद्वारे लेखी प्रतिज्ञापत्र दिल्याने, अखेर ओडिसा आणि स्थानिक पोलिसांनाही माघार घ्यावी लागली असून नातेवाईकांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.

कन्नड तालुक्यातील चिंचखेडा येथील रहिवासी असलेल्या विजय (वय १९ वर्ष, बदललेले नाव) याची काही महिन्यांपूर्वी स्नॅपचॅटवरून ओडिसातील संबलपूर येथील १८ वर्षीय श्रेयाशी (बदललेले नाव) ओळख झाली होती. सुरुवातीला चॅटिंग आणि नंतर फोनवरील संवादातून दोघांमध्ये घट्ट प्रेमसंबंध निर्माण झाले. श्रेयाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी विजय आधी ओडिसामध्ये तिच्या गावी गेला होता. तिथे प्रत्यक्ष भेटीनंतर दोघांनीही आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा आणि सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

भेटीनंतर विजय पुन्हा आपल्या गावी चिंचखेड्यात परतला. त्यानंतर महिनाभरापूर्वी तो पुन्हा ओडिसा राज्यातील श्रेयाच्या गावी गेला आणि तिला सोबत घेऊन कन्नड तालुक्यातील चिंचखेडा येथे आला. दरम्यान, श्रेया अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिच्या चिंतेत असलेल्या पालकांनी ओडिसा पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ओडिसा पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, श्रेयाचे लोकेशन थेट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असल्याचे समोर आले.

१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरने फिरवला डाव; नातेवाईक हतबल….

लोकेशन मिळताच ओडिसा पोलिसांचे एक पथक श्रेयाच्या नातेवाईकांसह कन्नडमध्ये दाखल झाले. कन्नड ग्रामीण पोलिसांच्या मदतीने या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीदरम्यान श्रेयाने सर्वांनाच मोठा धक्का दिला. तिने थेट १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले अधिकृत प्रतिज्ञापत्र पोलिसांसमोर सादर केले.

“मी पूर्णपणे सज्ञान असून स्वतःच्या मर्जीने येथे आले आहे. मला विजयसोबतच राहायचे आहे आणि मी घरी परतणार नाही,” अशी ठाम भूमिका श्रेयाने घेतली. तरुणी सज्ञान असल्यामुळे आणि तिने स्वतःच्या इच्छेने आल्याचे कायदेशीर लेखी लिहून दिल्याने ओडिसा व कन्नड ग्रामीण पोलिसांची मोठी कोंडी झाली आणि त्यांना कायदेशीररीत्या माघार घ्यावी लागली. या आगळ्यावेगळ्या प्रेमप्रकरणाची सध्या कन्नड तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत