Headlines

Lost Document Report For Lost ID Proof Aadhar Card Pan Card And Password ; वेळेआधीच सावध रहा! आधार कार्ड असो वा PAN Card, हरवलात तर पडू शकतं महागात; नेहमी लक्षात असूद्यात ‘या’ गोष्टी


भारतात आपली ओळख पटवून देणारे अनेक आयडी प्रूफ आहेत. पण त्यातील एकही आयडी प्रूफ आपल्याकडून हरवला तर आपल्याला ते कितपत महागात पडेल? याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. आपला आधार कार्ड , PAN कार्ड किंवा पासपोर्ट जर कुणा चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागला तर आपल्या नावाने अनेक गैरकृत्य होऊ शकतात आणि याची आपल्याला खबरही लागणार नाही. त्यामुळे अशावेळी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणताही आयडी प्रूफ हरवला की संबंधित कार्यालयात जाऊन किंवा पोर्टलवर जाऊन ताबडतोब तक्रार नोंदवली पाहिजे, अन्यथा पुढे अनेक समस्या उद्भवू शकतात.

लक्षात असू द्यात ‘या’ गोष्टी

आपला आधार कार्ड, PAN Card किंवा पासपोर्ट हरवला तर अशावेळी LDR करणे आवश्यक असते. LDR म्हणजे लॉस्ट डॉक्युमेंट रिपोर्ट. एकंदरीत, हरवलेल्या दस्तऐवजाची अधिकृत नोंद. ही नोंद करणे गरजेची असते कारण जर आपल्या हरवलेल्या दस्तऐवजाचा कुणी गैरवापर केलाही तरी आपल्याकडे ते हरवले असल्याची नोंद तर असतेच. मुख्य म्हणजे या दस्तऐवजांचा डुप्लिकेट तयार करताना केलेली LDR नोंद कामी येते.

कसे दाखल करतात LDR?

  • जर तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट हरवला असेल तर LDR नोंद दाखल करण्यासाठी पुढील प्रक्रिया फॉलो करा.
  • सगळ्यात आधी आपल्या राज्याच्या ‘ऑनलाईन पोलीस पोर्टल’ वर जा.
  • तिथे ‘लॉस्ट डॉक्युमेंट रिपोर्ट’ वर क्लिक करा.
  • मागण्यात आलेल्या आवश्यक माहितीची पूर्तता करा.
  • हरवलेल्या दस्तऐवजाविषयी आवश्यक ती माहिती पुरवा.
  • माहिती सबमिट करून डिजिटल प्रिंट स्वतःकडे ठेवा.

LDR करणे अनिवार्य नसले तरी त्याची नोंद करणे आपल्या फायद्याचे ठरू शकते. जर भविष्यात आपल्या हरवलेल्या आयडी प्रूफचा वापर करून कुणी गैरकृत्य करत असेल तर आपल्याकडे आधीपासून नोंदवलेली असलेली LDR फार महत्वाची ठरेल.

Maharashtra TimesMutual Fund मध्ये गुंतवणूक करता? लक्ष द्या! सेबीने नॉमिनीच्या नियमांमध्ये केले महत्वाचे बदल, जाणून घ्याआयडी प्रूफ हरवले तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

जर तुमचा आधार कार्ड हरवला आहे तर UIDAI च्या माध्यमातून इ-आधार डाउनलोड करू शकता. तर PVC आधार कार्डसाठीही अर्ज करता येते. PAN Card हरवल्यास रीप्रिंटसाठीही ऑर्डर करता येऊ शकते. जर तुमच्या डिव्हाईजमध्ये आधीपासून इ-प्रिंट असेल तर त्याला डाउनलोड करता येऊ शकतो. तसेच पासपोर्ट सेवा पोर्टलवरून पासपोर्ट रिइश्यू करता येते. पासपोर्ट रिइश्यू करताना पोलीस वेरिफिकेशनही होऊ शकते.

LDR ची नोंद असण्याचा फायदा काय?

जर आपला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट हरवला असेल तर अशावेळी LDR ची नोंद असणे फायद्याचे ठरते. कुणी आपल्या आयडी प्रूफचा गैरवापर केला तर आपले आयडी प्रूफ हरवले असल्याची नोंद आधीच झालेली असते. तसेच डुप्लिकेट आयडी प्रूफ काढतानादेखील LDR नोंदवलेले असणे अनेकदा उपयोगी पडते.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत