Akanksha Chamola Compare Gaurav Khanna with Dog:चर्चित आणि वादग्रस्त रिॲलिटी शो ‘लॉक अप २’ सध्या जोरदार चर्चेत आहे. शो सुरू झाल्यापासूनच सर्व स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टींचा खुलासा करत आहेत.

आपला पती आणि प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना याच्या शोमधील भेटीबद्दल बोलताना आकांक्षानं त्याला ‘स्ट्रेंजर’ (अनोळखी व्यक्ती) म्हणून संबोधलं आणि त्याच्याऐवजी कुटुंबातील कोणी किंवा पेट डॉग आला असता तरी चाललं असतं, असं म्हटलं. तिचं हे विधान समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत असून नेटकरी तिला ‘फेम डिगर’ (प्रसिद्धीची भुकेलेली) म्हणत सुनावत आहेत.
नक्की काय घडलंय नेमकं?
शोमध्ये जेव्हा स्पर्धक धीरज धूपरची पत्नी विन्नी अरोरा आणि इतर कुटुंबीय भेटायला आले, तेव्हा कौटुंबिक भेटींबद्दल चर्चा सुरू होती. या वेळी सह-स्पर्धक श्रेया कालरा आणि शिल्पा शिंदे यांच्याशी संवाद साधताना आकांक्षानं गौरव खन्नाच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली.
Ashadhi Wari: नख उपटल्यानं पायाला जखम झाली होती, एका छोट्या रूपा नावाच्या मुलीनं त्यावर पट्टी लावली, आदेश बांदेकरांनी वारीत अनुभवली मनाची श्रीमंती
आकांक्षा म्हणाली की, गौरव माझ्यासाठी नाही, तर स्वतःसाठी आला होता. माझ्यासाठी तर तो ‘एक्स’ आणि स्ट्रेंजरसारखाच आहे. त्याच्या ऐवजी माझ्या कुटुंबातील दुसरं कुणी आलं असतं, तर मला बरं वाटलं असतं,कम्फर्ट मिळाला असता. माझी आई, वडील किंवा माझा पाळीव कुत्रा जरी आला असता, तरी मला जास्त आनंद झाला असता. तिच्या या वक्तव्यानंतर शोमधील इतर सदस्य हसू लागले असले, तरी बाहेर सोशल मीडियावर मात्र यावरून तिच्यावर टीका केली जात आहे.
नेटकऱ्यांचा संताप
आकांक्षानं आपल्या पतीची तुलना थेट श्वानासोबत केल्यामुळं प्रेक्षक आणि गौरव खन्नाचे चाहते प्रचंड संतापले आहेत.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी तिला चांगलंच सुनावलं आहे.
Aastad Kale Video Post: ‘सगळे बाजारात विकून घ्यायला बसलेले नाहीत’आस्ताद काळेच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा, ट्रोल करणाऱ्याला चांगलंच सुनावलं
‘फेम डिगर’
गौरव खन्नाच्या नावाचा वापर करून फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी ती शोमध्ये आली आहे. गौरवच्या नावाशिवाय तिच्याकडं दुसरा कोणता गेमच नाही. अजून कायदेशीर घटस्फोट झालेला नसताना पतीला ‘स्ट्रेंजर’ म्हणणं आणि त्याची तुलना श्वानाशी करणं हे अत्यंत चुकीचं आहे, आकांक्षा एक ‘फेम डिगर’ आहे, अशा कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.
घटस्फोटाचा खुलासा आणि नात्यातील दुरावा
आकांक्षा आणि गौरव खन्ना याचं लग्न विवाह २४ नोव्हेंबर २०१६ रोजी झालं होतं. मात्र ‘ लॉक अप २ ‘ च्या प्रीमियर एपिसोडमध्ये आकांक्षानं ते दोघे गेल्या काही काळापासून वेगळं राहत असून घटस्फोट घेणार असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. यानंतर फॅमिली वीकदरम्यान गौरव खन्नाने शोमध्ये हजेरी लावून आकांक्षाची भेट घेतली होती. त्या वेळी गौरवनं आपण अद्याप कायदेशीररीत्या विभक्त झालो नसल्याचं स्पष्ट केलं होतं आणि शोमध्ये वैयक्तिक गोष्टी जाहीर केल्याबद्दल तिची कानउघाडणीही केली होती.

