नेदरलँड्समधील मॅक्स प्लँक मानसशास्त्रीय भाषाविज्ञान संस्था, फ्रान्समधील बोर्डो विद्यापीठ आणि नॉर्वेतील ओस्लो विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला. झीचियांग शा, अँटोनेटा पेपे, डिक शाइव्हेन, अमाया कॅरिऑन-कॅस्टिलो, जेम्स रो आणि क्लाइड फ्रँक्स यांच्यासह संशोधकांचा यात सहभाग होता.
Nagpur Accident : मित्राच्या बर्थडेला निघाले, स्पीड वाढवला अन् घात झाला, दोघा मित्रांचा करुण शेवट, कार चालकाचे वडील गोत्यातसंशोधकांनी मेंदूच्या बाह्य थरातील विविध भागांची रचना तसेच डाव्या-उजव्या बाजूंमधील असममितता तपासली. डावखुऱ्या व्यक्तींमध्ये कपाळाच्या आतील काही भाग, हालचालींशी संबंधित क्षेत्रे, दृष्टीशी संबंधित भाग आणि भाषेशी निगडित क्षेत्रांमध्ये उजव्या हाताने काम करणाऱ्यांच्या तुलनेत सरासरी फरक आढळले. हे फरक अत्यंत सूक्ष्म असले, तरी सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे संशोधकांनी नमूद केले.
या मेंदूभागांचा संबंध हातांच्या हालचालींचे नियंत्रण, भाषा, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता आणि इतर कार्यकारी क्षमतांशी जोडला जातो. विशेष म्हणजे, डावखुऱ्यांमध्ये हाताच्या हालचालींशी संबंधित कार्यांचा झुकाव मेंदूच्या उजव्या गोलार्धाकडे तुलनेने अधिक दिसून आला. मात्र, या निष्कर्षाचा अर्थ डावखुऱ्या व्यक्ती अधिक बुद्धिमान किंवा त्यांचा मेंदू अधिक चांगला असतो, असा होत नाही.
Nagpur Pollution: मुंबई अन् पुण्यापेक्षा नागपूर अधिक प्रदूषित; उन्हाळ्यात 46 दिवस धूलिकण मर्यादेपेक्षा अधिकपक्षाघातानंतर सुधारणा तुलनेने सोपी ?
डावखुऱ्यांबाबत बोलताना शहरातील ज्येष्ठ मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल शेंबाळकर म्हणाले, ‘सर्वसाधारणपणे उजव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये मेंदूचा डावा भाग अधिक सक्रिय असतो, तर डाव्या हाताने काम करणाऱ्यांमध्ये उजव्या भागाचा सहभाग अधिक दिसतो. मात्र, डावखुऱ्यांच्या मेंदूचे उजवे आणि डावे असे दोन्ही भाग तुलनेने अधिक समन्वयाने काम करतात. त्यामुळे पक्षाघातात मेंदूच्या एका भागाला फटका बसल्यास दुसरा भाग काही प्रमाणात ती जबाबदारी सांभाळण्यास मदत करू शकतो. या नैसर्गिक ‘ड्युअल बॅकअप’ सारख्या क्षमतेमुळे पक्षाघातानंतरची सुधारणा डावखुऱ्यांसाठी तुलनेने सोपी ठरू शकते.
नेमके काय आढळले ?
-अभ्यासाचा आकार : ३१,८६४ व्यक्तींच्या मेंदू प्रतिमांचे विश्लेषण
-डावखुरे सहभागी : ३,०६२
-उजव्या हाताचे सहभागी : २८,८०२
-मुख्य निष्कर्ष : मेंदूच्या काही भागांत सूक्ष्म रचनात्मक फरक
-संबंधित क्षमता : हालचालींचे नियंत्रण, भाषा, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता
-महत्त्वाची नोंद : डावखुरे अधिक बुद्धिमान असतात, असा निष्कर्ष नाही
