![]()
Sachin Ahir : विरोधकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन! उपसभापतिपदी बिनविरोध निवडीनंतर सचिन अहिर यांची ग्वाही
राजकारणात काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात. तो घेतला नसता तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता उपसभापतिपदी पोहोचला नसता. अगदी कालपर्यंत मी विरोधी पक्षात होतो आणि आता त्यांची साथ सोडल्याने काहीशी नाराजी असणे स्वाभाविक आहे. परंतु, माझ्या उपसभापतिपदाच्या कारकीर्दीच्या माध्यमातून मी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन’, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सचिन अहिर यांनी व्यक्त केली.
