Headlines

Kranti Redkar Praises Husband Sameer Wankhede ; Kranti Redkar On Sameer Wankhede : नशीब लागतं असा नवरा मिळायला! क्रांती रेडकरने केलं नवरा समीर वानखेडेचे कौतुक, व्यस्त असूनही मुलींच सगळं करतात


अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पूर्वी सिनेमे, आणि डान्स साठी प्रसिद्ध असलेली क्रांती आता मात्र तिच्या सोशल मीडिया कंटेंट मुळे सतत चर्चेत असते. क्रांती अनेकदा दिवसभरात घडलेले किस्से किंवा मुलींच्या करामती अगदी रंजक भाषेत व्हिडिओ बनवून सादर करते. तिच्या या व्हिडिओला प्रेक्षकांचीही भरपूर पसंती मिळत असते. पूर्वी क्रांतीने कधीच तिच्या मुलींचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र सोहम बांदेकर च्या लग्नात तिच्या मुलींसोबत चे फोटो भरपूर व्हायरल झाले त्यानंतर मात्र तिने त्यांची जगाशी ओळख करून दिली.

क्रांतीच्या जुळ्या मुली या सुद्धा तिच्यासारख्याच खेळकर आहेत. याशिवाय क्रांती तिचा नवरा समीर वानखेडे यांच्यासोबतचेही काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
नुकताच फिल्मफेअर मराठी अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रांतीने सुद्धा उपस्थिती लावलेली. रेड कार्पेटवर एका मुलाखतीमध्ये क्रांतीने तिच्या मुली आणि नवरा समीर वानखेडे यांच्या बद्दल भरभरून भाष्य केले.

Maharashtra TimesSaif Ali Khan First Wedding : सैफ अली खान आणि अमृता सिंहच्या लग्नाला गेल्या नव्हत्या सख्ख्या बहिणी सबा आणि सोहा, 35 वर्षांनी सांगितलं खरं कारण

समीर वानखेडे यांच्या बद्दल बोलताना क्रांती म्हणाली की असा नवरा मिळाला नशीब लागतं. ते असले की मला कसलीच काळजी करावी लागत नाही. छबिल आणि गोदोला भरवण्यापासून ते अगदी झोपवण्यापर्यंत ते सगळं नीट करतात. ते मला कामांमध्येही मदत करतात. ते असले की मला कसलीच भीती नसते कारण मला माहित असतं की माझ्या मुलांची ते व्यवस्थित काळजी घेतात.

वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना माझं आणि समीरचं बॉण्डिंग घट्ट होतं. आम्हाला नवीन जागा बघायला आवडतात. ऐतिहासिक वास्तूंची आम्हाला प्रचंड आवड आहे. आम्ही इतिहासाबद्दल वाचतो, किती वेळ घालवतो. वेगवेगळ्या ठिकाणी जेवण ट्राय करायला आम्हाला खूप आवडतं. याच गोष्टीत आमचं प्रेम आहे. समीर यांना आंतरराष्ट्रीय जेवण ट्राय करायला खूप आवडतं. ते ड्राय जेवण आवडीने जेवतात. अनेकांना तर ते घशाखाली उतरत नाही. बेगल चीज यांसोबत ते बऱ्याच गोष्टी खातात. मला मात्र बिर्याणी आणि मालवणी फिश करी यांसारख्या गोष्टी खायला आवडतात.

Maharashtra TimesChiyaan Vikram : माकडासोबतचा व्हिडिओ टाकून पुरता फसला अभिनेता! वनविभागाची कारवाई, दुर्मिळ जातीच्या वानराच्या तस्करीचा संशय

मुलाखतीमध्ये क्रांती रेडकरने नवर्‍याच्या स्वभावाबद्दल सुद्धा सांगितले. ती म्हणाली की समीर स्वभावाने थोडे लाजरे बुजरे आहेत. ते जास्त बोलत नाहीत आणि अतिशय शिस्तप्रिय आहेत. मेहनत केली की त्यांच्याकडून दोन शब्द निघतात. आमच्या दोघांचेही स्वभाव वेगळे आहेत. त्यामुळेच कदाचित आमचं खूप छान जमतं. दोघेही बडबडे असतो तर कदाचित एवढी मजा आली नसती.

याशिवाय मुली छबील आणि गोदो बद्दल सांगताना क्रांती म्हणाली की त्या दोघींनाही मी स्वामींची पोथी वाचून झोपावते. स्वामींचा अशक्य हे शक्य करतील स्वामी हा तारक मंत्र ऐकून त्या झोपतात. त्यांना सुद्धा हा मंत्र येतो.

क्रांती रेडकरच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास तिने 2002 मध्ये सून असावी अशी या सिनेमातून पदार्पण केले होते. याशिवायतीने बॉलीवूडमध्ये सुद्धा 2003 मध्ये रिलीज झालेल्या गंगाजल या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. जत्रा या सिनेमातल्या कोंबडी पळाली या गाण्यामुळे ती घराघरात सुपरहिट झाली. केवळ सिनेमा पुरते मर्यादित न राहता काकण यासारख्या सिनेमाचे तिने दिग्दर्शनही केले आहे. नो एन्ट्री पुढे धोका आहे, शहाणपण देगा देवा, फक्त लढ म्हणा , शिक्षणाच्या आईचा घो, तीन बायका फजिती ऐका यांसारख्या सिनेमांमधील अभिनयामुळे ती लोकप्रिय झाली. तिने डान्स शो सुद्धा जज केले आहे.


याशिवाय श्रीमंत दामोदर पंत या नाटकात सुरुवातीला ती विजय चव्हाण यांच्या सुनेची भूमिका साकारत होती. तसेच ती स्वत:चा कपड्यांचा ब्रॅण्डसुद्धा चालवते.