Headlines

Kolhapur soldier vikram chavan; आईच्या निधनाचा आघात ताजा असतानाच देशासाठी प्राणांची आहुती! उरीत कोल्हापूरचे विक्रम चव्हाण शहीद; चिमुकली पोरकी झाली, उद्या पार्थिव गावी पोहचणार


कोल्हापूरच्या विक्रम चव्हाण यांनी देशसेवेत प्राणांची आहुती दिली. उरी सेक्टरमध्ये गस्तीदरम्यान झालेल्या स्फोटात ते शहीद झाले. उद्या त्यांचे पार्थिव गोंडोली गावात येणार आहे. गावकऱ्यांमध्ये सध्या शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने दोन वर्षीय मुलीच्या वडिलांचा आधार हरवला आहे.

kolhapur shahuwadi gondoli vikram chavan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरच्या संवेदनशील कमलकोट क्षेत्रात मंगळवारी एका भीषण दुर्घटनेत कोल्हापुरातील एका जवानाला शहीद व्हावे लागले. नियंत्रण रेषेजवळ (LoC) नियमित गस्त घालत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात भारतीय सेनेच्या 8 राष्ट्रीय रायफल्स (RR) यूनिटचे दोन जवान शहीद झाले. अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण चव्हाण (वय 28) अशी अशी या दोन शहीद जवानांची नावे आहेत. दोघेही महाराष्ट्रातील राहणारे असून विक्रम चव्हाण हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावाचे आहेत. सध्या ते नवी मुंबईच्या ऐरोलीत राहत होते.

उपचारांदरम्यान प्राणज्योत मालवली

स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, दोघे जवान गंभीर जखमी झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करून जखमींना हेलिकॉप्टर आणि विशेष लष्करी वाहनांच्या मदतीने श्रीनगरमधील बदामीबाग येथील 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम चव्हाण यांनी 2018 मध्ये सैन्यात प्रवेश केला होता. त्यांची पहिली नियुक्ती राजस्थानमधील सुरतगड येथे झाली होती. कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय सैनिक म्हणून त्यांची ओळख होती.

पार्थिव उद्या गोंडोलीत येणार

विक्रम चव्हाण यांच्या पश्चात वडील बाळकृष्ण, पत्नी रुपाली, दोन वर्षांची मुलगी वीरा, भाऊ सागर आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते; त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीदांचे पार्थिव शुक्रवारी गोंडोली येथे आणण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra TimesFIFA World Cup 2026 : अमेरिका-इराण युद्धाचा ‘फिफा’वर परिणाम, इराणकडून वर्ल्डकपचे सामने थांबवण्याचा इशारा, कारण काय?

स्फोटाबद्दल काही खुलासा नाही

दरम्यान हा स्फोट कोणत्या कारणाने झाला, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही; सैन्याने या दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे. उरी सेक्टर नियंत्रण रेषेचा अत्यंत संवेदनशील भाग असून घुसखोरी आणि सुरक्षा आव्हानांमुळे येथे सैन्याची उच्च स्तरावरील गस्त वाढवण्यात आली आहे. तर कोल्हापुरात गोंडोली गावासह संपूर्ण शाहुवाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांकडून वीर जवानास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा