Headlines

Kolhapur Pethwadgaon Husband Killed Wife Status on WhatsApp Before Killed; ‘आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी’; स्टेटस ठेवून पत्नीला भररस्त्यात संपवलं, ‘विषय संपला’ म्हणत मिशीवर ताव, प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत


Kolhapur Husband Killed Wife : कोल्हापूरमधील पेठवडगाव हादरलं असून भरपावसात एसटी स्टँडवर पतीनं पत्नीला वार करुन संपवलं. घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून दीपक कांबळे आणि अमृता कांबळे यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

Kolhapur Husband Killed Wife
कोल्हापूर पेठवडगाव पतीने पत्नीची हत्या केली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या पेठवडगाव शहरात काल बुधवारी सायंकाळी एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीचा भररस्त्यात, गजबजलेल्या बाजारपेठेत कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. विशेष म्हणजे, या कृत्यापूर्वी आरोपीने मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटस ठेवून हत्येचा इशारा दिला होता. भर पावसात घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

‘आज माझा तर शेवट, तुझा तर शेवट’

संशयित आरोपी दीपक लाडू कांबळे (वय 35, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) याने हे भयानक पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर एक धक्कादायक स्टेटस ठेवला होता. ‘आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी शेवट’, अशा आशयाचा संदेश त्याने सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या डिजिटल पुराव्यामुळे हा खून पूर्वनियोजित असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
Maharashtra TimesSarpanch Mangesh Sable: सरपंच मंगेश साबळेंना अटक; गोंधळ घालत जिल्हाधिकाऱ्यांना एकेरी भाषेत आव्हान

एसटी स्टँड परिसरात रक्ताचा सडा

बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अमृता दीपक कांबळे (वय 30) या एसटी स्टँडच्या पाठीमागील एका कॉम्प्लेक्समध्ये वकिलाला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी दीपक तिथे पोहोचला आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वादाचं रूपांतर हिंसाचारात झालं आणि दीपकने आपल्याजवळील धारदार कोयत्याने अमृता यांच्यावर हल्ला चढवला. त्याने अमृता यांच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले, ज्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळल्या. पावसाची संततधार सुरू असतानाच घडलेल्या या घटनेनं परिसरात रक्ताचा सडा पडला होता.

‘ती माझी पत्नी आहे, तुम्ही पडू नका’

हा भयानक प्रकार सुरू असताना परिसरातील काही धाडसी तरुणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीपकने त्यांना अत्यंत उद्धटपणे आणि थंड डोक्याने उत्तर दिले. ‘ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका,’ असे ओरडून त्याने मध्यस्थी करणाऱ्यांना दूर सारलं आणि अमृता यांच्यावर पुन्हा वार केले. त्यानंतर ‘विषय संपवला’ असं म्हणत आणि मिशीवर ताव मारत घटनास्थळावरून तो फरार झाला.
Maharashtra TimesPune Rain Updates: पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांसह प्रसिद्ध धबधब्यांवर पर्यटकांना बंदी; कधीपर्यंत राहणार निर्बंध?

आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत

अमृता आणि दीपक यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दीपक अमृताच्या चारित्र्यावर संशय घेत होता, ज्यातून त्यांच्यात वारंवार कौटुंबिक कलह होत असे. सुखी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या या जोडप्याचा अंत असा क्रूर होईल, अशी कल्पनाही सावर्डे ग्रामस्थांनी केली नव्हती.
Maharashtra TimesDahivali Landslide : चुलत्यांचं घर दिसेनासं, धोका दिसताच नातेवाईकांना बाहेर काढलं, स्वत: 20 फूट खाली उडी मारली; रत्नागिरीतील ‘ती’ व्यक्ती ठरली देवदूत

या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख चौधरी, उपनिरीक्षक प्रियांका खाडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने रक्ताचे नमुने आणि अन्य पुरावे संकलित केले आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, फरार आरोपी दीपक कांबळे याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास वडगाव पोलीस करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा