Kolhapur Heavy Rains Water Level of Panchganga River Rises Communication with Villages in Rural Areas Lost; कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, गगनबावड्यात धुव्वाधार, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटला
Kolhapur Heavy Rains Water Level of Panchganga River Rises Communication with Villages in Rural Areas Lost; कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, गगनबावड्यात धुव्वाधार, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटला
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून कोणतीही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा नाही.
कोल्हापूर पंचगंगा नदी पाणीपातळी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला असून संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 52.34 मिमी पावसाची नोंद झाली असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 101.3 मिमी इतका विक्रमी पाऊस पडला आहे. सर्वत्र कोसळत असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीने पात्र सोडले असून पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे.
नद्यांची स्थिती आणि पाण्याखालील बंधारे
सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. राजाराम बंधारा येथे आज सोमवारी दुपारी 12 वाजता 33 फूट 6 इंच इतकी पाणीपातळी नोंदवण्यात आली आहे. जरी नदी अद्याप इशारा पातळीच्या 39 फूट खाली असली तरी, वाढलेल्या पाणीपातळीमुळे जिल्ह्यातील तब्बल 51 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी आणि तेरवाड यांसारख्या महत्त्वाच्या बंधाऱ्यांचा समावेश आहे. भोगावती, कासारी, कुंभी आणि वारणा नद्यांवरील अनेक बंधारेही पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागातील संपर्क काही प्रमाणात विस्कळीत झाला आहे. Crime News: ११ वर्षांच्या मुलीला अस्वस्थ वाटू लागलं, आईने तपासणीसाठी डॉक्टरकडे नेलं; रिपोर्ट येताच कुटुंब कोसळले!
धरणांतील पाणीसाठा
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक वाढत आहे. ऐतिहासिक राधानगरी धरणात सध्या 41 टक्के 3.15 टीएमसी पाणीसाठा असून धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे सध्या बंद आहेत. तुळशी धरणात 41 टक्के, वारणा धरणात 28 टक्के, तर दूधगंगा धरणात 13 टक्के साठा आहे. वारणा आणि दूधगंगा धरणातून प्रत्येकी 100 क्युसेक विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात जवळपास 13 लाखांचे नुकसान
पावसाचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3 राज्यमार्ग, 5 प्रमुख जिल्हा मार्ग आणि 10 इतर ग्रामीण मार्ग असे एकूण 18 रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे रेल्वे वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत आहे. पावसामुळे जिल्ह्यात पडझडीच्या घटना घडल्या असून सुमारे 13 लाख 87 हजार रुपयांचे अंदाजित नुकसान झाले आहे. यामध्ये राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 4.25 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पन्हाळा आणि शाहूवाडी भागातही मोठी हानी झाली आहे. Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता, त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगी देवस्थान बंद, अनेक रस्तेही बंद राहणार
संभाव्य परिस्थितीसाठी प्रशासन सतर्क
जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संभाव्य पूरपरिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. सद्यस्थितीत कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्याची आवश्यकता भासलेली नाही. महसूल आणि पोलीस प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी नदीकाठी किंवा धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता आगामी 24 तास महत्त्वाचे ठरणार आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा