व्हनाळी : शेंडूर फाटा ते व्हनाळीआणि व्हनाळी ते साके रस्त्याच्या दुतर्फा हत्ती गवत आणि वैरण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावरील धोकादायक वळणांवर समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, संबंधित विभागाने तातडीने हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
व्हनाळी-साके चिमट्याचा बडा याजुन्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या रस्त्याच्यासाके-व्हनाळी रस्त्याच्या दुतर्फा हत्ती गवत आणि वैरण वाढल्यामुळे रस्ता अरुंव होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
दोन्ही बाजूंना हत्ती गवताची लागण केल्यामुळे रस्ता झाकोळला गेला आहे. परिणामी, चालकांचा अंदाज चुकून वाहन रस्त्याकडेला घसरणे व अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली
आहे. विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि ग्रामस्थांना या मार्गावरून दैनिक प्रवास करताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आला असून, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन हा रस्ता अतिक्रमणमुक्त करावा, अश मागणी नागरिकांमधून होत आहे.
नाल्याच्या बाहेर हत्ती गवत
रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्या आणि त्याच्यानंतर पाणी निचरा होण्यासाठी नाला काढलेला असताना अनेक शेतकयांनी अतिक्रमण करून नाल्याच्या बाहेर रस्त्यालगत हाती गवताची लागणच केली आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
