Headlines

Kolhapur Crime News | कोल्हापुरात गोळीबाराने खळबळ; भाजप कार्यकर्त्यावर दोघांचा हल्ला


कोल्हापूर | दिवसेंदिवस राज्यात क्राईमच्या घटना वाढत चालल्या आहेत… आता कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. सूरज साखरे असं या कार्यकर्त्यांचं नावं आहे, सूरज साखरे हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. खासगी सावकारकीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापुरात भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, कोल्हापुरातल्या वाशी नाका येथे घडली असुन नवी वाशी नाका परिसरात ही घटना घडली .सुरज साखरे यांच्यावर दोघांनी गोळीबार केला. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरज साखरे यांच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला? हल्लेखोर कोण आहेत? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे कोल्हापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत