Ketan Agrawal Pune Lohagad Murder Siya Goyal Search History reveals study of Raja Raghuvanshi Case Crime News; केतन आपल्याला वरुन पाहतोय, खंबीर राहा; सियाचा ‘सासऱ्यांना’ धीर, जेलमध्ये जाण्याची पूर्वतयारी, सर्च हिस्ट्रीत भांडाफोड
Ketan Agrawal Pune Lohagad Murder Siya Goyal Search History reveals study of Raja Raghuvanshi Case Crime News; केतन आपल्याला वरुन पाहतोय, खंबीर राहा; सियाचा ‘सासऱ्यांना’ धीर, जेलमध्ये जाण्याची पूर्वतयारी, सर्च हिस्ट्रीत भांडाफोड
Siya Goyal Search History on Raja Raghuvanshi Case : पोलीस कोठडीत असताना महिलांना मारहाण केली जाते का, हे जाणून घेण्यासाठीही सियाने इंटरनेटवर शोध घेतल्याची माहिती तिच्या दोन्ही मोबाईल फोन्सच्या सर्च हिस्ट्रीवरुन समोर आली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने केतनचा जीव घेण्यापूर्वी इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाबाबत माहिती मिळवली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस कोठडीत असताना महिलांना मारहाण केली जाते का, हे जाणून घेण्यासाठीही सियाने इंटरनेटवर शोध घेतला होता. ही माहिती तिच्या दोन्ही मोबाईल फोन्सच्या सर्च हिस्ट्रीवरुन समोर आली आहे. याचा अर्थ केतनच्या हत्येनंतर आपण पकडे जाऊ शकतो, यादृष्टीनेही सियाने तयारी केल्याचे दिसते.
दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी सियाला तिच्या घरी नेले होते, तिथे तिच्या बेडरुममधून दुसरा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. या घटनेचे प्रत्यक्षदर्शीही शोधून काढण्यात आले असून त्यांच्या जबाबांमुळे तपासाला अधिक बळकटी मिळत आहे.
१८ जून रोजी पुण्यातील लोहगड किल्ल्यावर सिया आणि चेतन यांनी केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. सध्या हे दोघेही १६ जुलैपर्यंत येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
राजा रघुवंशी मर्डर केस
इंदूरचे व्यावसायिक राजा रघुवंशी आणि सोनम यांचा ११ मे २०२५ रोजी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांनी हे जोडपे हनिमूनसाठी मेघालयाला गेले. २३ मे २०२५ रोजी आपल्या होमस्टेवरुन बाहेर पडल्यानंतर ते बेपत्ता झाले. २ जून २०२५ रोजी सोहरा येथील ‘वेई सॉडोंग’ धबधब्याजवळील एका खोल दरीत राजाचं शव सापडलं होतं.
पोलिसांचा आरोप आहे की, त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिने तिचा प्रियकर राज कुशवाह आणि इतरांच्या मदतीने राजाच्या हत्येचा कट रचला होता. सोनम रघुवंशीला सध्या मेघालय उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सियाचा आक्षेपार्ह इशारा
सिया गोयल हिने प्रसारमाध्यमांकडे पाहून आक्षेपार्ह इशारा केल्याचा दावा तिच्या वडिलांनी फेटाळून लावला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, कायदेशीर प्रक्रियेसाठी सियाला घरी आणले जात असताना गाडीचा दरवाजा बंद होताना तिच्या दोन बोटांना दुखापत झाली होती; ती केवळ ती दुखापत दाखवत होती.
त्यांनी असाही दावा केला की, त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी या दुखापतीच्या वृत्ताला दुजोरा देऊ शकतात. पोलीस कोठडीत नेले जात असताना सियाने मधले बोट दाखवून आक्षेपार्ह इशारा केल्याचे दिसणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओमुळे हा वाद निर्माण झाला होता.
केतन आपल्याला वरुन पाहतोय; खंबीर राहा
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १९ जून रोजी सियाने केतनच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांचे सांत्वन करताना म्हटले, “केतन आपल्याला वरून पाहत आहे; खंबीर राहा.” तपासातून असे समोर आले की, १८ जून ते २३ जून या काळात दोन्ही आरोपींचे दैनंदिन जीवन सामान्यपणे सुरु होते. अगदी अटकेनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची कोणतीही चिन्हे दिसून आली नाहीत.
पोलिसांच्या तपासात हे देखील उघड झाले की, केतनच्या हत्येतील दुसरा आरोपी चेतन चौधरी एकाच मोबाईल हँडसेटवर दोन सिम कार्ड्सचा वापर करून सियाशी ‘कोड वर्ड्स’च्या माध्यमातून संवाद साधत असे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा