Ketan agarwal lohgad fort death case siya goyal mother reveals details about love affair with chetan choudhary; सियाने तिच्या प्रेमप्रकरणाची तुम्हाला कल्पना दिली होती? शॉपिंगचा उल्लेख करत आईने सगळं सांगितलं
Ketan agarwal lohgad fort death case siya goyal mother reveals details about love affair with chetan choudhary; सियाने तिच्या प्रेमप्रकरणाची तुम्हाला कल्पना दिली होती? शॉपिंगचा उल्लेख करत आईने सगळं सांगितलं
Pune Ketan Agarwal Case: केतनसह लोहगडावर जाण्यापूर्वी लुल्लानगर येथील कॅफेत सिया आणि चेतन भेटले होते. तेथेच त्यांनी १८ जूनला पुन्हा लोहगडावर जाण्याचा प्लॅन आखल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरच सियाने केतनला फोन करून लोहगडावर जायचे असल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
सियाने तिच्या प्रेमप्रकरणाची तुम्हाला कल्पना दिली होती? शॉपिंगचा उल्लेख करत आईने सगळं सांगितलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल या तरुणाचा काही दिवसांपूर्वी खून करण्यात आला. रिअल इस्टेट व्यावसायिक कुटुंबातील हा तरुण असून त्याची होणारी पत्नी सिया प्रवीण गोयल आणि तिचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी यांच्यावर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात सियाने केतनला किल्लावर नेले होते आणि प्रियकराच्या मदतीने त्याला कड्यावरून ढकलून त्याचा खून केल्याचे उघड झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात असताना संशयित सिया गोयल हिच्या आई-वडिलांनीही आपली भूमिका मांडत या प्रकरणात सिया दोषी असल्याचं सिद्ध झाल्यास तिलाही लोहगड किल्ल्यावर नेऊन कड्यावरून ढकलून द्यावं, अशी कठोर मागणी केली आहे.
सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल आहेत. या वेळी काही वृत्तसंस्थांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी केतन अगरवाल याच्या मृत्यूविषयी दुःख व्यक्त केलं. तसंच सिया गोयल दोषी असल्यास न्यायालयाने उशीर न करता तिलाही कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी प्रवीण गोयल यांनी केली आहे.
सियाची आई काय म्हणाली?
सियावर होणाऱ्या आरोपावर प्रतिक्रिया देताना सियाच्या आईने म्हटलं आहे की, ‘होणाऱ्या जावयाने आम्हाला मुलापेक्षाही अधिक प्रेम दिले. त्याच्या मृत्युला आमची मुलगी जबाबदार असेल, तर दोषींना फाशीची शिक्षा द्या,’ अशी भावना सियाच्या आईने व्यक्त केली. तसंच यावेळी त्यांना सियाच्या प्रेमप्रकरणाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. “सियाच्या प्रेमप्रकरणाविषयी तिच्या कुटुंबीयांनाही कल्पना होती, मात्र तरीही त्यांनी आम्हाला धोका दिला,” असा आरोप मृत केतन अगरवाल याच्या वडिलांनी केला आहे. यावर बोलताना सियाची आई म्हणाली की, “तिच्या प्रेमप्रकरणाविषयी किंवा तिच्या डोक्यात काय सुरू आहे, याबाबत आम्हाला कसलीही कल्पना नव्हती. तसं असतं तर मी लग्नासाठी ५० हजार रुपये खर्चून तिच्यासोबत शॉपिंग का केली असती? पण अगरवाल कुटुंबाच्या म्हणण्यानुसार आम्ही दोषी आढळलो तर गोयल कुटुंबातील सगळ्यांनाच शिक्षा द्या,” अशी प्रतिक्रिया सियाच्या आईने व्यक्त केली आहे.
‘‘लोहगड’प्रकरणी ‘एसआयटी’ नेमा’
केतन अगरवाल हत्या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, असा आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिला. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. विधानसभेतील चर्चेदरम्यान आमदार सुनील शेळके यांनी या प्रकरणातील तपास अधिक व्यापक आणि निष्पक्ष पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे सांगितले. घटनेमागील संपूर्ण कट, आरोपींना मिळालेली संभाव्य मदत; तसेच इतर संबंधित बाबींचा सखोल तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा