तब्बूच्या चित्रपटाच्या सीक्वेलकरता नावाची चर्चा
कॅटरिना कैफ दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसून आलेली नाही. अशास्थितीत अभिनेत्री एका सीक्वेलसाठी बोलणी करत आहे. या चित्रपटात तब्बू देखील मुख्य भूमिकेत असू शकते. कॅटरिना कैफ सीक्वेल चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतण्यास तयार असल्याचे समजते. निर्मात्यांनी या प्रोजेक्टविषयी अधिक माहिती देणे टाळले आहे. तर कॅटरिना या प्रोजेक्टमध्ये सामील असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांदरम्यान मोठा उत्साह निर्माण झाला आहे. कॅटरिना कैफ 2001 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘चांदनी बार’चा सीक्वेल ‘चांदनी बार 2’साठी तयारी करत आहे. या सीक्वेलचे दिग्दर्शन अजय बहल करणार असून सध्या याच्या कलाकारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चांदनी बार या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भंडारकर यांनी पेले होते. या क्राइम ड्रामामध्ये मुंबईच्या अंडरवर्ल्डचे जग दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात तब्बूने एका डान्सरची भूमिका साकारली होती.
कॅटरिना यापूर्वी सूर्यवंशी, फोन भूत, टायगर 3 आणि मेरी क्रिसमस या चित्रपटांमध्ये दिसून आली होती. अभिनयासोबत तिने स्वत:चा ब्यूटीब्रँड वाढविण्यावरही लक्ष केंद्रीत केले आहे.
