Headlines

Kanda Express Onion Train ; साखरेपाठोपाठ कांदाही सुसाट! चालवली जातेय स्पेशल ट्रेन, नक्की काय आहे ‘कांदा एक्सप्रेस’?


देशात महागाई वाढत चालली आहे. याचा फटका देशातील सर्वसामान्यांवर बसला आहे. स्वयंपाकघरातील दैनंदिन वापरातल्या गोष्टी महागल्या आहेत. अगदी देशातील जनतेचे जेवणही महागले आहे. वाढत्या महागाईचा फटका देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या पोटाला जाणवू लागला आहे. साखरेमागोमाग डाळीही महागल्या आहेत. खाद्य तेल महागले आहेत. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे कांद्यानेही साखरेचीच वाट धरली आहे. कांदा पुन्हा एकदा महागाईची मर्यादा तोडून देशातील सामन्यांच्या खिशावर भार बनला आहे.

देशात चालवली जातेय विशेष ट्रेन

मुळात, देशभरातील वाढत्या कांद्याचा भाव लक्षात घेता देशात कांद्याचा पुरवठा वाढवण्यावर भर दिला जात आहे. सरकारी Buffer Stock बाजारात आणला जात आहे. तसेच देशातील अशा शहरांमध्ये कांद्याचा पुरवठा वाढवण्यात येत आहे, ज्या शहरात कांद्याचा भाव सरासरी किंमतीपेक्षाही जास्त आहे. अशा शहरांमध्ये कांदा पुरवठा वाढवण्यासाठी नाशिकहून कांदा एक्सप्रेस सोडण्यात येत आहे. दिल्ली, चेन्नई, कोची तसेच गुवाहाटी या शहरांच्या दिशेने कांदा एक्सप्रेस रवाना झाली आहे.

देशात कांद्याचा किंमती का वाढल्या?

मुळात, महाराष्ट्र राज्य कांदा पुरवठादार म्हणून ओळखला जातो. कांद्याच्या किंमत वाढीला कारणीभूत पुरवठ्यात असणारी मंदी आहे. कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे कारण बाजारात मुबलक कांदा उपलब्ध नाही. रबी हंगामात झालेल्या गारपीट तसेच अवकाळी अतिवृष्टीमुळे रबी कांद्याचे उत्पादन कमी झाले. अशात देशात मान्सूनची एंट्रीही उशिरा झाली त्यामुळे खरीफ कांद्याच्या पेरणीत उशीर झाला. या दोन कारणांमुळे कांदा पुरवठीचे संपूर्ण गणित कोलमडले आणि देशाला Buffer Stock बाजारात आणण्याचा निर्णय घ्यावा लागला.

कांदा एक्सप्रेस चार मोजक्याच शहरांत का चालवली जात आहे?

कांद्याचा वाहतुकीसाठी चालवण्यात येणारी कांदा एक्सप्रेस सुरुवातीला दिल्ली, गुवाहाटी, चेन्नई आणि कोची या शहरांच्या दिशेने चालवण्यात येत आहे. नाशिकहून या चार शहरांच्या दिशेने कांदा एक्सप्रेस रवाना केली जात आहे. मुळात, या चारही शहरांमध्ये कांद्याच्या किंमती सरासरी किंमतीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे येथे कांदा पुरवठ्यात वाढ करणे कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी गरज बनली आहे.

Maharashtra TimesJuly 2026 DA Hike: जुलै महिन्याची DA वाढ कोणत्या वेतन आयोगानुसार, 7 वा की 8 वा? तुमच्या पगारावर होणारा परिणाम समजून घ्याकांदा उत्पादक जिल्हा नाशिकही कांद्याच्या वाढत्या किंमतीने त्रस्त

देशाचा कांदा पुरवठादार म्हणून महाराष्ट्र राज्याकडे पाहिले जाते तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांदा पिकवणारा जिल्हा म्हणजे नाशिक. देशभरात कांद्याच्या किंमती वाढत असताना प्रमुख कांदा उत्पादक नाशिकही सारख्याच समस्येने त्रस्त आहे. मे 2026 महिन्यांत नाशिक जिल्ह्यात 11.50 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने विकला जाणारा कांदा ऑगस्ट 2026 महिन्यात 24.14 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने विकला जात आहे.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत