Justin Greaves Creates History as Pakistan Crumble Against West Indies Top 5 Memes and Jokes Viral | ‘१५० वर्षात अशी बॉलिंग कोणीच केली नव्हती’, कापलं पाकिस्तानचं नाक, जस्टिन ग्रीव्ह्सवर भन्नाट मीम्स व्हायरल
Justin Greaves Creates History as Pakistan Crumble Against West Indies Top 5 Memes and Jokes Viral | ‘१५० वर्षात अशी बॉलिंग कोणीच केली नव्हती’, कापलं पाकिस्तानचं नाक, जस्टिन ग्रीव्ह्सवर भन्नाट मीम्स व्हायरल
Justin Greaves Memes: वेस्ट इंडिजनं पाकिस्तानचा ९० धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जस्टिन ग्रीव्ह्स या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याच्या खतरनाक गोलंदाजीवर मीम्स व्हायरल होत आहेत.
ai generated images
वेस्ट इंडिजनं कसोटी सामन्यात पाकिस्तानचा धुरळा उडवला. वास्तविक पाकिस्तानचा पराभव काही नवा नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांचा संघ सातत्याने पराभूत होत असतो. मात्र, यावेळी वेस्ट इंडिजच्या एका गोलंदाजानं सलग पाच मेडन ओव्हर्स टाकत पाच विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक विक्रम रचला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहतेही त्याचं कौतुक करत असून, सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून पाकिस्तानी संघाची फिरकी घेतली जात आहे. चला पाहूया PAK vs WI सामन्यावर व्हायरल होणारे मीम्स.
या सामन्यात वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात ३११ धावा, तर दुसऱ्या डावात १८१ धावा केल्या.
पाकिस्तानला दुसऱ्या डावात विजयासाठी २११ धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. मात्र, त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या १२० धावांवर गारद झाला आणि वेस्ट इंडिजनं ९० धावांनी शानदार विजय मिळवला.
या विजयाचं मोठं श्रेय जस्टिन ग्रीव्ह्स याला जातं. त्यानं दोन्ही डावांत मिळून सात विकेट्स घेतल्या. त्यापैकी पाच विकेट्स त्यानं दुसऱ्या डावात सलग पाच मेडन ओव्हर्समध्ये घेतल्या.
गेल्या १५० वर्षांहून अधिक काळाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग पाच विकेट-मेडन ओव्हर्स टाकण्याचा विक्रम यापूर्वी कोणीही केला नव्हता. त्यामुळे जस्टिन ग्रीव्ह्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या पराभवासह दोन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान १-० ने पिछाडीवर गेला आहे. दुसरीकडे, हा विजय मिळवत वेस्ट इंडिजनं कसोटी क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडवली आहे.
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा