Headlines

Jio Platforms IPO SEBI Approval; रिलायन्स जिओच्या आयपीओवर सेबीची मोहोर, 37700 कोटींचा असेल भारताचा सर्वात मोठा IPO; पाहा A टू Z डिटेल्स


Jio Platforms IPO: मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओच्या आयपीओची घोषणा केल्यापासून गुंतवणूकदार या इश्यूच्या छोट्या-मोठ्या अपडेट्सवर लक्ष ठेवून असून आता या आयपीओ लाँच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाजार नियामक सेबीने या आयपीओला मंजुरी दिली असून जिओच्या 37,000 कोटींचा आयपीओ इश्यू देशांतर्गत बाजारातील सर्वात मोठा इश्यू असेल.

जिओ आयपीओला सेबीचा हिरवा कंदील

बाजार नियामक सेबीच्या माहितीनुसार 28 ऑगस्ट रोजी जिओ प्लॅटफॉर्म्सला आपली अंतिम टिप्पणी दिली आणि कंपनीने जूनमध्ये सेबीकडे प्रस्तावाचा मसुदा सादर केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी मंजुरी दिली. जिओ प्लॅटफॉम्स आयपीओचा आकार इतकाच राहिल्यास हा भारतातील सर्वात मोठ्या आयपीओंपैकी बनू शकतो. सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या संभाव्य इश्यू आकारासह, जिओचा आयपीओ ह्युंदाई मोटर इंडियाच्या पब्लिक इश्यूला मागे टाकून भारतातील सर्वात मोठा आयपीओ बनू शकतो.

Maharashtra TimesShare Market: CAS चा पायगुण, मुंबई शेअर बाजारात खळबळ; 5 मिनिटांत कमावले 44 लाख रुपये, ट्रेडर्सही चक्रावलेसुमारे 37,000 कोटींचा प्रस्तावित इश्यू ह्युंदाई मोटर इंडियाच्या 27,870 कोटींच्या आयपीओपेक्षा लक्षणीयरीत्या मोठा असेल, जो सध्या भारतातील सर्वात मोठा इश्यू आहे. अशाप्रकारे, कंपनीचे मूल्य सुमारे 9.5 लाख कोटी रुपये होऊ शकते.

मात्र, जिओ आयपीओच्या इश्यूचा फायनल आकार रचनेवर आणि लॉन्चच्या वेळी फायनल किंमतीवर अवलंबून असेल. जिओ प्लॅटफॉर्म्सने 27 कोटी इक्विटी शेअर्स जारी करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामध्ये ऑफर-फॉर-सेल नसेल. म्हणजे, विद्यमान भागधारक आयपीओ अंतर्गत आपला हिस्सा विकणार नाही तर, आयपीओ पूर्णपणे नवीन इश्यू असेल.

Maharashtra TimesGold Silver Price Fall: सुवर्णकाळ संपला? अमेरिकेतून बातमी येताच सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीचे दरही गडगडले; गुंतवणूकदारांची पळापळ

रिलायन्स इंडस्ट्रीजचा हिस्सा किती

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल आणि टेलिकॉम व्यवसायातून व्हॅल्यू अनलॉक करण्याच्या योजनेतून आयपीओ लाँच केला जाणार आहे. प्रस्तावित इश्यूपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचा जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 66.43% हिस्सा होता, तर मेटा प्लॅटफॉर्म्स आणि गूगलचा अनुक्रमे 9.98% आणि 7.73% होता. तसेच इतर प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये सौदी अरेबियाचा पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (2.31%), केकेआर (2.31%), व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स (2.31%), सिल्व्हर लेक (1.88%) आणि मुबाडाला (1.85%) यांचा समावेश आहे.

दरम्यान, आता सेबीच्या मंजुरीनंतर जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओ प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांत एंटर करेल. यामध्ये फायनल ऑफर दस्तऐवज दाखल केले जाईल, प्राइस बँड निश्चित होईल आणि इश्यूची वेळ जाहीर करण्याचा समावेश असेल.

Maharashtra TimesUS Oil Deal : अखेर ट्रम्पनी हवं तेच केलं; इराण युद्धात दादागिरी करून 65 अब्ज बॅरल तेल हिसकावलेजिओ आयपीओचे सविस्तर तपशील

  • जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल, ज्यामध्ये 27 कोटी शेअर्स जारी केले जातील.
  • यामध्ये ऑफर फॉर सेल चा कोणताही घटक असणार नाही आणि आयपीओमधून मिळणारा पैसा थेट कंपनीला मिळेल.
  • या इश्यूपैकी कमाल 50% शेअर्स QIBs (पात्र भागधारकांसाठी) राखीव ठेवले जाऊ शकतात, तर किमान 35% शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असतील.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पात्र भागधारक आणि कर्मचाऱ्यांना किती शेअर्स राखीव मिळतील, याबाबत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.