Headlines

Jio Credit-Bank of America Deal; मुकेश अंबानींनी अमेरिकेसोबत केली मोठी डील; 18,268 कोटींची गुंतवणूक भारतात येणार, BofA शी हातमिळवणी


भारताचे अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानींच्या कंपनीत मोठ्या हालचाली सुरू आहेत. अलीकडेच मुकेश अंबानींनी जिओ IPO लाँच करण्याबद्दल AGM मधून गुंतवणूकदारांना माहिती दिलेली तर, आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने बँक ऑफ अमेरिकासोबत आपला आर्थिक सेवा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठा करार केला आहे.

मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि बँक ऑफ अमेरिका यांनी भारताच्या आर्थिक क्षेत्रात मोठी भागीदारी जाहीर केली आहे. बँक ऑफ अमेरिका अंबानींच्या Jio Financial Services Limited ची नॉन-बँक फायनान्शियल कंपनी जिओ क्रेडिट लिमिटेड या कर्ज देणाऱ्या उपकंपनीत मोठी गुंतवणूक करणार आहे. दरम्यान, जिओ लिमिटेडच्या या घोषणेनंतर आता देशांतर्गत शेअर बाजारातील या कंपनीच्या स्टॉकवर गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष लागून असेल.

Maharashtra Timesपरदेशात राहणाऱ्या पेन्शनर्ससाठी महत्वाची बातमी! लाईफ सर्टिफिकेट कराल सादर तरच मिळेल पेन्शन, पण ते करायचे कसे? जाणून घ्या

जिओ क्रेडिटमध्ये अमेरिकी बँकेचा हिस्सा

Jio Credit Limited मधील संयुक्त उपक्रमाबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला असून या अंतर्गत बँक ऑफ अमेरिका अंदाजे 1.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 18,268 कोटींची गुंतवणूक करेल आणि Jio क्रेडिटमध्ये जास्तीत जास्त 49.9 टक्के हिस्सा खरेदी करेल.

हा करार जिओ क्रेडिटचे मूल्य निव्वळ मूल्याच्या सुमारे 2.5 पट आहे, विशेष म्हणजे जिओ क्रेडिट सुरू होऊन आता फक्त दोन वर्षेच झाली असताना अंबानींच्या या कंपनीने BlackRock आणि Allianz नंतर तिसरी मोठी भागीदारी जाहीर केली आहे.

Maharashtra Timesभारताचं तांदूळ नैसर्गिक नसल्याचे सांगत चीनकडून बंदी; 7 निर्यातदारांची नोंदणीच तात्पुरती रद्द

जिओ क्रेडिटमध्ये हिस्सा कसा खरेदी करणार?

भारतीय शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार बँक ऑफ अमेरिकाची उपकंपनी NB होल्डिंग्ज प्रेफरेंशियल शेअर्स आणि वॉरंटद्वारे जिओ क्रेडिटमध्ये गुंतवणूक करेल. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात कंपनी सुमारे 6,613 कोटींची गुंतवणूक करून 4.29 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करेल ज्यामुळे NB होल्डिंग्सला Jio क्रेडिटमध्ये सुमारे 26.50 टक्के हिस्सा मिळेल.

त्यानंतर, बँक ऑफ अमेरिकाचे हेच युनिट सुमारे 11,655 हेच मध्ये 7.56 कोटी वॉरंटचे सब्स्क्रिप्शन घेईल आणि प्रत्येक वॉरंटचे 18 महिन्यांच्या आत एका इक्विटी शेअरमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. अशाप्रकारे, 25 टक्के रक्कम वॉरंट खरेदी करताना दिली जाईल, तर उर्वरित रक्कम शेअर्समध्ये रुपांतरित करताना भरावी लागेल तर, सर्व वॉरंटचे शेअर्समध्ये रूपांतर केल्यानंतर बँक ऑफ अमेरिकाचा हिस्सा 49.90% पर्यंत वाढेल.

Maharashtra Timesटाटा सन्सच्या चेअरमनला पगार किती असतो? पाच वर्षात 650 कोटी रुपये कमवणाऱ्या एन चंद्रशेखरन यांचा पगार, बोनस सर्वांची माहितीBofA सोबत भागीदारीवर मुकेश अंबानींचे निवेदन

या भागीदारीदाबद्दल जारी केलेल्या निवेदनात मुकेश अंबानी म्हणाले की, “2047 पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करणारी विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक अशी आर्थिक व्यवस्था असणे आवश्यक आहे.” तसेच उद्योगपती पुढे म्हणाले की “जिओ फायनान्शिअल तंत्रज्ञान आणि उत्तम प्रशासनाद्वारे भारतीयांसाठी आर्थिक सेवा सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून बँक ऑफ अमेरिकाचे जागतिक कौशल्य आणि जिओची डिजिटल पोहोच यांच्या संयोजनामुळे भारतात क्रेडिट ऍक्सेस वाढविण्यात मदत होईल.”

जिओ क्रेडिट करते काय?

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची NBFC कंपनी Jio Credit ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज पुरवते. कंपनीने अल्पावधीतच मोठा व्यवसाय उभारला आणि फक्त दोनच वर्षांत असेट मॅनेजमेंट 30,667 कोटींवर, म्हणजे सुमारे $3.2 अब्ज, पोहोचली. मात्र, जिओ क्रेडिट अद्याप असुरक्षित वैयक्तिक कर्ज आणि ग्राहक वित्त यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उतरलेली नाही. त्यानंतर आता कंपनीचे लक्ष डिजिटल पद्धतीने कर्ज देणे आणि भारतात क्रेडिट ऍक्सेस वाढवण्यावर आहे.

अशा परिस्थितीत, BofA सोबत या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट जिओ फायनान्शिअलची मजबूत डिजिटल पोहोच आणि बँक ऑफ अमेरिकाच्या जागतिक आर्थिक कौशल्यासह भारतातील स्थानिक बाजारपेठेतील समज यांची सांगड घालण्याचे आहे. दोन्ही कंपन्या डिजिटल वित्तीय सेवा, नवीन क्रेडिट उत्पादने, जोखीम व्यवस्थापन आणि ग्राहकांना क्रेडिटची वाढती उपलब्धता यावर काम करतील.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वर्तक, महाराष्ट्र टाइम्स डिजिटलमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारीता आणि वेबसाइट मीडियामध्ये सक्रिय आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करत आहेत आणि क्रीडा व बिझनेस क्षेत्रात कार्यरत आहे. आतापर्यंत मला फ्री प्रेस जर्नल इंग्लिश वेबसाईट आणि लेट्सली मराठी या ठिकाणी कामाचा अनुभव आहे. मी पर्यंत कंटेंट रायटर आणि डिजिटल प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. एस. के. सोमय्या कॉलेजमधून BMM चे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर मुंबई विद्यापीठातून कम्युनिकेशन अँड जर्नलिज्ममध्ये मास्टर्स पदवी घेतली आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील वेगवेगळ्या घडामोडी, क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, लेटेस्ट ट्रेंड या घडामोडींमध्ये मला रस आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत