Jawan Vaibhav Shrikrishna Lahane from Akola Kapileshwar was Martyred in Kupwara Sector of Jammu Kashmir; ‘दोस्तों-साथियों, हम चले दे चले…’; महाराष्ट्रातील आणखी एका सुपुत्राला वीरमरण; कुपवाडा सेक्टरमध्ये वैभव लहाने शहीद
Jawan Vaibhav Shrikrishna Lahane from Akola Kapileshwar was Martyred in Kupwara Sector of Jammu Kashmir; ‘दोस्तों-साथियों, हम चले दे चले…’; महाराष्ट्रातील आणखी एका सुपुत्राला वीरमरण; कुपवाडा सेक्टरमध्ये वैभव लहाने शहीद
Akola Soldier Vaibhav Lahane Martyred : अकोल्याचा सुपूत्र नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आलं आहे. ते कुपवाडामध्ये कार्यरत असताना शहीद झाले आहेत.
अकोला कपिलेश्वर वैभव लहाने शहीद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, अकोला : आईच्या कुशीत वाढलेला, मातीशी नाळ जोडलेला आणि तिरंग्यासाठी श्वास घेतलेला एका शूर जवानाचं नाव आज कायमच इतिहासात कोरलं गेलं आहे. देशाच्या संरक्षणासाठी हसत-हसत प्राणाची आहुती देणाऱ्या अकोला जिल्ह्यातील नायक वैभव लहाने यांच्या वीरमरणाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या शौर्याने आणि बलिदानाने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावलेली आहे.
‘शहीद जवान अमर रहे’
अकोला जिल्ह्याचे सुपुत्र नायक वैभव श्रीकृष्ण लहाने हे भारतीय सेनेतील 12 मराठा लाईट इन्फंट्री तुकडीत कार्यरत होते. दहशतवाद विरोधी (काउंटर इन्सर्जन्सी) कारवाई दरम्यान जम्मू – काश्मीर मधील कुपवाडा सेक्टर येथे कर्तव्यावर असताना 7 जानेवारी रोजी त्यांना वीरमरण आले. शहीद जवान वैभव लहाने यांच्यावर अकोला जिल्ह्यातील कपिलेश्वर या त्यांच्या मूळगावी सैनिकी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनिकांनी मानवंदना दिली. तर पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या 3 फैरी झाडून सलामी देत मानवंदना दिली. यावेळी ‘शहीद जवान अमर रहे’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तसेच संपूर्ण गावकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या होत्या. Kolhapur Political News : कोल्हापूरध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील धनुष्यबाण हाती घेणार
परिवाराच्या डोळ्यात अश्रू
प्रत्येक आई – वडिलांना वाटतं की, आपल्या मुलाने आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवावं आणि शहीद जवान वैभव लहाने यांनी देशासाठी बलिदान दिल्यानं अकोल्यासह देशाचीही मान उंचावली आहे. वैभव यांच्या आई – वडील, भाऊ, बहीण आणि आप्त परिवाराच्या डोळ्यात अश्रू दिसतात, पण देशासाठी वैभव यांनी दिलेल्या बलिदानाने त्यांचीही मान उंचावली आहे. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कुणाल झाल्टे, मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे CHM रामेश्वर पाटील यांच्यासह मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे सैनिक, व वैभव लहाने यांच्या कुटुंबियांनी पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले. जवान वैभव लहाने यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. देशासाठी प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं काही तरी करावं, पण हे सगळ्यांच्या नशिबी नसतं. आपल्या देशाचं रक्षण करत वैभव लहाने यांचं बलिदान सर्वांना प्रेरणा देणारं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा