jasprit bumrah passes fitness test at bcci coe available for sri lanka test series ; बुमराहचं वादळ परतणार, भेदक माऱ्यापुढे श्रीलंका ढेपाळणार! जसप्रीत फिटनेसमध्ये पास, पण टीमसाठी चिंता कायम, कारण काय?
jasprit bumrah passes fitness test at bcci coe available for sri lanka test series ; बुमराहचं वादळ परतणार, भेदक माऱ्यापुढे श्रीलंका ढेपाळणार! जसप्रीत फिटनेसमध्ये पास, पण टीमसाठी चिंता कायम, कारण काय?
Bumrah Fitness Test Passed : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता श्रीलंका दौऱ्यात खेळू शकणार आहे. होय, कारण त्याने आता फिटनेस टेस्ट पास केली आहे. अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे. जाणून घ्या.
जसप्रित बुमराह फिटनेस टेस्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघासाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बंगळुरू येथील ‘बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलन्स’मध्ये (COE) आपली फिटनेस टेस्ट यशस्वीपणे पास केली आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तो निवडीसाठी उपलब्ध असणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या दृष्टीने भारत आणि चाहत्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्याने काय सांगितले?
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, “जसप्रीत बुमराह आता त्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. सेंटर ऑफ एक्सीलन्सने घेतलेल्या सर्व फिटनेस चाचण्या त्याने पास केल्या आहेत. तो दोन्ही कसोटी सामन्यांसाठी संघात उपलब्ध असेल. भारतीय संघाच्या योजनांमध्ये तो अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे.”
इंग्लंडविरुद्ध मालिकेदरम्यान झाली होती दुखापत
इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान बुमराहला दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे त्याला लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागले होते. पण आता वैद्यकीय टीमने त्याला पूर्णपणे फिट घोषित केले आहे आणि खेळण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळवला जाईल. तर दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे होणार आहे.
डब्लूटीसी फायनलच्या शर्यतीत ही मालिका महत्त्वाची
जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) मालिकेच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे. फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला उरलेल्या ९ कसोटी सामन्यांपैकी किमान ७ सामने जिंकावे लागतील. अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्ध २-० अशी मालिका जिंकणे भारतासाठी खूप गरजेचे आहे. या मालिकेनंतर भारताला न्यूझीलंडच्या कठीण दौऱ्यावर जायचे आहे.
बुमराहच्या पुनरागमनाने संघाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी भारतीय संघातील अनेक खेळाडू अजूनही दुखापतींशी झुंजत आहेत. हर्षित राणा दुखापतीमुळे (हॅमस्ट्रिंग) संघाबाहेर आहे. नितीश रेड्डी आपल्या दुखापतीतून सावंरतोय. वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. आकाश दीप पाठीच्या दुखापतीमुळे बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. अशा कठीण परिस्थितीत जसप्रीत बुमराहचे पूर्णपणे फिट होणे भारतीय वेगवान गोलंदाजीला मोठी ताकद देणारे ठरणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा