Japanese Yen Currency Crisis: आतापर्यंत अमेरिकी डॉलरसमोर कमजोर होणारा जपानी येन, गेल्या काही दिवसांपासून अचानक मजबूत होऊ लागला आहे. जपानच्या चालनाने (येन) 40 वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. केवळ जपानच नव्हे तर दक्षिण कोरियाही आपल्या घसरत्या चलनाला सावरण्यासाठी बाजारात उतरला असून अमेरिकाही त्यांना मदत करत आहे, ज्याचा भारताला फायदा होऊ शकतो आणि याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्या खिशावर होऊ शकतो.

40 वर्षांतील नीचांकीवर जपानी चलन
अमेरिकी डॉलरच्या समोर सततच्या कमजोरीमुळे केवळ जपानी अर्थव्यवस्थेवरच परिणाम झाला नाही तर, जागतिक वित्तीय बाजारातही चिंता वाढली. पण अलीकडील घडामोडींमुळे आता करन्सी बाजारातील चित्र बदलत असल्याचे दिसत असून अमेरिका आणि जपान यांच्यातील वाढत्या समन्वयामुळे येन मजबूत होत आहे. तीन दिवसांपूर्वी जपानचे चलन येन अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 163 पर्यंत घसरून गेल्या 40 वर्षांतील सर्वात नीचांकीवर कमी झालेले.
जपानी चलनाची घसरगुंडी
त्याचवेळी, जपानी चलन याआधी 1986 नंतरच्या सर्वात नीचांकीवर घसरलेले. पण आता चलनातील रिकव्हरी केवळ बाजारातील घटना नसून अमेरिका आणि जपान यांच्या संयुक्त धोरणाचा परिणाम आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न निर्माण होतो की अमेरिकेला जपानी चलन वाचवण्यात अचानक इतका रस का वाटत आहे? यामागे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांमागील महत्त्वपूर्ण आर्थिक गणित असण्याचा अंदाज आहे.
जपानी चलन कमजोर होण्याने कारण काय
मागील काही वर्षांत अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हने – महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदर उच्च ठेवलेले. दुसरीकडे जपानने दीर्घकालीन अनुकूल चलनविषयक धोरण अवलंबले असून दोन्ही देशांच्या व्याजदरांमधील वाढत्या तफावतीमुळे गुंतवणूकदारांनी अधिक परताव्यासाठी डॉलरकडे मोर्चा वळवला परिणामी, गुंतवणूकदारांनी डॉलर खरेदी करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे डॉलर सातत्याने मजबूत झाला आणि येनला घसरती कळा लागली.
जपानी चलन अचानक मजबूत कसं झालं?
मात्र, आता जपानी चलनातील घसरण थांबली असून गेल्या काही दिवसांपासूनच्या तेजीमागे अनेक कारणे आहेत. एकीकडे बाजारात येन खरेदी वाढली प्रमुख बँकांशी करार झाले पण यापैकी सर्वात महत्त्वाचे अमेरिका आणि जपान यांच्यातील नवीन आर्थिक समन्वयाने यात महत्त्वाची भूमिका बजावली. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आणि जपानचे अर्थमंत्री सात्सुकी कातायामा यांच्यातील चर्चेनंतर, दोन्ही देशांनी आर्थिक स्थिरता राखण्यास सहमती दर्शवली.
बैठकीदरम्यान स्कॉट बेसेंट यांच्या नोटपॅडवरील ‘5 ते 10 अब्ज डॉलर्स किमतीचे जपानी येन खरेदी’ ही नोंद कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यावरून अमेरिका येनला स्थिर ठेवण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले.
अमेरिकेची नेमकी अडचण काय?
जपानी चलन स्थिर व्हावं असं अमेरिकेलाही वाटतं. येन कमकुवत होताच जपान अमेरिकेच्या दुसऱ्या जागेवर दबाव आणतो – ट्रेझरी विकतो, ज्यामुळे अमेरिकेचे कर्ज वाढते. अशा परिस्थितीत, आपल्या घसरत्या चलनाला आधार देण्यासाठी जपानला अधिक अमेरिकन ट्रेझरी विकणे भाग पडू नये, याची अमेरिकेला खात्री करायची आहे कारण जपानच्या या हालचालींमुळे अमेरिकेतील कर्ज घेण्याचा खर्च आणखी वाढेल.
जपानची मदत करून अमेरिकेला काय फायदा?
अशा परिस्थितीत वरवर पाहता अमेरिका आपल्या मित्र राष्ट्राला मदत करत असल्याचं दिसतं पण, महासत्तेचा वैयक्तिक फायदा आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी बॉण्ड्स म्हणजे अमेरिकन सरकारी कर्ज रोख्यांमध्ये जपान जगातील सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे. म्हणजे जपानकडे सर्वाधिक अमेरिकन सरकारी बॉण्ड्स आहेत, ज्यांना आपल्या परकीय चलन साठ्याचा भाग मानतो. जपानला आपले चलन मजबूत करायचे असते, तेव्हा आपल्या परकीय चलन साठ्यातून अमेरिकन ट्रेझरी बॉण्ड्स विकतो आणि डॉलर्सच्या बदल्यात जपान येन खरेदी करतो. यामुळे बाजारात येनची मागणी वाढते आणि किंमत स्थिर होऊ लागते, पण अमेरिकन बॉण्ड्सची विक्री केल्याने अमेरिकेच्या बॉण्ड बाजारावर थेट परिणाम होतो.
जागतिक बाजारांवर काय परिणाम होणार?
जपानी चलनाला – येन – जागतिक वित्तीय प्रणालीमध्ये प्रमुख चलन मानले जाते आणि या चलनातील चढ-उतारांचा परिणाम आशियाई बाजार, परकीय गुंतवणूक, वस्तूंच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर होतो. अशा स्थितीत, येन स्थिर करण्यासाठी अमेरिका आणि जपान एकत्र आले तर, जागतिक वित्तीय बाजारांमधील अस्थिरता कमी होऊ शकते. यामुळे अमेरिकेच्या बॉण्ड बाजारावरील दबावही कमी होईल आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल.

