Headlines

Jalna and Partur Taluka Dindi Highway Large Cracks Numbers of Accidents Increased; कोट्यवधीचा खर्च, पंढरीच्या वारीसाठी धार्मिक महामार्ग म्हणून ओळख; जालन्यातील दिंडी महामार्गाला भल्यामोठ्या भेगा


Jalna Dindi Highway Crack : ज्या महामार्गावरुन पंढरीची वारी जाते, ज्या महामार्गाचा वापर धार्मिक वारीसाठी केला जातो. अशा महामार्गाला आता मोठ-मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या महामार्गासाठी करोडो रुपयांचा खर्च देखील करण्यात आला होता.

Jalna Dindi Highway Crack
वाटूर मांठा सिमेंट काँक्रीट रस्त्याला भेगा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वाटूर ते मांठा या दिंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. करोडो रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी लांबच लांब तडे गेल्याचं चित्र समोर आलं असून, त्यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिक आणि वाहनधारकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

पंढरपूर वारीसाठी धार्मिक महामार्ग

वाटूर ते मांठा दिंडी महामार्गाचं काम काही वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी तसेच पंढरपूर वारीसाठी धार्मिक महामार्ग आहे तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मात्र, रस्त्याचं काम पूर्ण होऊन फारसा कालावधी लोटलेला नसतानाही रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचं दिसून येत आहे. काही ठिकाणी या भेगा इतक्या रुंद झाल्या आहेत की, दुचाकी वाहनांचं संतुलन बिघडून दर तीन-चार दिवसाला छोटे-मोठे अपघात होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आता प्रत्यक्षात रस्त्यावर तडे गेल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहेत. विशेषत दुचाकीस्वार आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या भेगांमुळे अधिक धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या काळात या भेगांमध्ये पाणी साचल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Maharashtra TimesThane Old Man Assault VIDEO : ठीक आहात का? परप्रांतीय कॅब चालकाच्या मारहाणीत दुखापत, ठाण्यातील वृद्धाला राज ठाकरेंचा फोन

छोटे-मोठे अपघात होतात

या महामार्गावर यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. रस्त्यावरील भेगा, काही ठिकाणी असलेले खड्डे आणि वेगाने धावणारी वाहने यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता संपूर्ण रस्त्याची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनीही या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रस्त्यांची अशी अवस्था होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
Maharashtra TimesCrime News: ७ वीतील मुलीला नशेचं औषध पाजलं, बेशुद्ध होताच काका-पुतण्याकडून अत्याचार; नंतर व्हिडिओही बनवले, अखेर नराधमांना अटक

रस्त्याला भल्यामोठ्या भेगा

दरम्यान, संबंधित विभागाकडून या रस्त्याची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाटुर ते मांठा दिंडी महामार्गावरील भेगा तातडीने बुजवून रस्ता सुस्थितीत आणणे आवश्यक असल्याचे मत परिसरातून व्यक्त होत आहे. आता या सर्व बाबीकडे संबंधित विभाग किती गांभीर्याने लक्ष देतो व महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करतो का कारण अवघ्या काही दिवसांवर आता दिंड्यांना सुरुवात होणार आहे, आणि दिंडी मार्ग म्हणून प्रसिद्ध असलेला या दिंडी महामार्गाला तडे गेल्याने याची दुरुस्तीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा