Headlines

Isro blast threat इस्रो मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेल मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क


► वृत्तसंस्था
बेंगळूर
भारताची अंतराळ संस्था (इस्रो) मुख्यालयाला गुरुवारी पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे. हा धमकीचा ईमेल अंतराळ संस्थेच्या बेंगळूर येथील मुख्यालयात पाठवण्यात आला होता. संभाव्य हल्ल्याचा अलर्ट मिळताच सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. सुरक्षा नियमांनुसार तात्काळ तपास सुरू करण्यात आला. बॉम्ब शोधक पथके आणि पोलीस पथकांनी शोधमोहीम राबवली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळली नाहीत.

यापूर्वी, 29 जून रोजी इस्रो आणि इतर भारतीय सरकारी संस्थांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. या धमकीमध्ये एनआयए, डीआरडीओ, एनपीसीआयएल आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांसारख्या उच्च-सुरक्षा असलेल्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते.

इस्रोला मिळालेल्या पहिल्या धमकीप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे ईमेलचा माग काढला. मोबाईल क्रमांक आणि इतर तपशिलांवरून असे दिसून आले की आरोपी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील संयोग नगरमध्ये राहतो. 36 वर्षीय निशांत त्यागीला 30 जून रोजी त्याच्या घरातून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान निशांत 2008 पासून मानसिक आजारावर उपचार घेत असल्याची माहिती समोर आली. त्याच्या कुटुंबीयांनीही याला दुजोरा दिला. मात्र, आता धमकी देण्यामागील त्याच्या हेतूचा तपास सुरू आहे. अटकेच्या कारवाईवेळी कोणतेही स्फोटक साहित्य जप्त करण्यात आलेले नाही.
इस्रोसह सर्व संवेदनशील संस्थांमध्ये आधीच कडक सुरक्षा व्यवस्था आहे. सीआयएसएफ, स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा 24 तास पाळत ठेवत असतात. तथापि, डिजिटल जगात ईमेलसारख्या सोप्या माध्यमांतून धमक्या देणे अधिक सोपे झाल्यामुळे सायबर सुरक्षा मजबूत करण्यावर विशेष भर दिला जात आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत