Headlines

Isha Talwar : ‘मी अभिनय सोडून तुकाराम भाऊंच्या टीममध्ये जाण्याचा विचार करतेय’, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत


Actress On Tukaram Mundhe : सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं तुकाराम मुंढे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

isha malvia on tukaram mundhe
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – महाराष्ट्रातील भेसळयुक्त पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक कलाकारांनीही तुकाराम मुंढे यांचं कौतुक केलं आहे. अशातच आता ‘मिर्झापूर’ फेम बॉलिवूड अभिनेत्री ईशा तलवारनं तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक करत सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्रीकडून तुकाराम मुंढे यांचं कौतुक

महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधं विकणारे हॉटेल्स, दुकानं तसेच कारखान्यांवर कडक कारवाई केली आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण त्यांच्या या कारवाईचं कौतुक करत आहेत. याच दरम्यान अभिनेत्री ईशा तलवारनं तिच्या इन्स्टाग्रामवर तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची दखल घेत एक पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीनं लिहिलं की, ‘मी अभिनय सोडून तुकाराम भाऊंच्या टीममध्ये जाण्याचा विचार करतेय…’

Maharashtra TimesTukaram Mundhe : ‘व्यक्ती कुणीही असो, कारवाई केली जाईल’, अजय, शाहरुख, टायगरच्या ‘विमल इलायची’ जाहिरातीबाबत तुकाराम मुंढेंची ठाम भूमिका
तसेच ही पोस्ट शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये ‘प्रेरणादायी’ असं लिहीत तुकाराम मुंढे यांच्या प्रामाणिक आणि धडक कारवाईबद्दल आदर व्यक्त केला आहे. ईशानं केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे.

Isha Talwar Post

कोण आहे ईशा तलवार ?

ईशा तलवार बद्दल सांगायचं तर तिनं गाजलेल्या ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये माधुरी यादवची प्रमुख भूमिका साकारली होती. ईशानं हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिनं ट्युबलाईट, कालाकांडी, रन बेबी रन, कामयाब, शर्माजी नमकीन, परछाई आणि इंडियन पोलीस फोर्स यांसारख्या विविध चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.

तुकाराम मुंढे यांच्या भेसळमुक्त मोहिमेला सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा पाठिंबा, काय केलं पाहा

दरम्यान, ‘विमल इलायची’च्या जाहिरातीचं प्रकरण चर्चेत आलं आहे. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीत बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ सहभागी झाले होते. या जाहिरातीद्वारे प्रत्यक्ष तंबाखूजन्य किंवा पान मसाला उत्पादनाचे अप्रत्यक्षपणे प्रमोशन केलं जात असल्यानं त्यावर FDA नं आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या कारवाईनंतर तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. व्यक्ती कितीही मोठी किंवा प्रसिद्ध असली तरी नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. जाहिरात तयार करणारे, त्यात सहभागी होणारे आणि संबंधितही सर्व नियमांच्या चौकटीत येतात, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा