Headlines

Insulin Resistance & male female Infertility causes, symptoms, signs and remedies Explained; इन्सुलिन रेझिस्टन्समुळे वाढतो का वंध्यत्वाचा धोका? इन्सुलिनमुळे इनफर्टिलिटी येते का, इन्सुलिन रेझिस्टन्स कसा रोखावा?


वंध्यत्वामागे केवळ हार्मोन्स किंवा वाढते वयच कारणीभूत नसते, तर इन्सुलिन रेझिस्टन्सही महत्त्वाची भूमिका बजावते. ही मेटाबॉलिक समस्या महिलांमध्ये PCOS, अनियमित पाळी आणि बीजांड निर्मितीवर परिणाम करते, तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी करून शुक्राणूंची गुणवत्ता बिघडवू शकते. योग्य वेळी निदान, संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स सुधारू शकतो आणि गर्भधारणेची शक्यता वाढू शकते. इन्सुलिन रेझिस्टन्स, वंध्यत्व आणि दीर्घकालीन आरोग्याचा संबंध जाणून घ्या.

insulin resistance and male female fertility
insulin resistance and male female fertility
गेल्या दशकात भारतातील तरुण दांपत्यांमध्ये वंध्यत्व (Infertility) ही एक गंभीर आणि वेगाने वाढणारी समस्या बनली आहे. उशिरा होणारे विवाह, ताणतणावाची जीवनशैली आणि प्रदूषणासारख्या घटकांवर अनेकदा चर्चा होते. परंतु, यामागील एक अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ (Insulin Resistance). सामान्यतः मधुमेहाशी जोडली गेलेली ही चयापचयाची (Metabolic) समस्या पुरुष आणि स्त्री दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर खोलवर परिणाम करू शकते. इन्सुलिन हे स्वादुपिंडाने तयार केलेले संप्रेरक आहे, जे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणे बंद करतात, तेव्हा स्वादुपिंड जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करतो. रक्तातील साखरेची पातळी सामान्य दिसत असली तरी इन्सुलिनचे प्रमाण वाढलेले राहते. हाच मेटाबॉलिक असंतुलन पुढे प्रजनन हार्मोन्सना विस्कळीत करतो.

महिलांमधील ‘पीसीओएस’ आणि बीजांड निर्मितीतील अडथळे

महिलांमधील 'पीसीओएस' आणि बीजांड निर्मितीतील अडथळे

महिलांमधील वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण म्हणजे ‘पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ (PCOS). पीसीओएस असलेल्या बहुतांश महिलांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हा मूळ आजार असतो, मग त्या महिला लठ्ठ असोत किंवा बारीक.

  • पुरुषी हार्मोन्सची वाढ (Androgens) : रक्तातील वाढलेले इन्सुलिन स्त्रीपिंडाला (Ovaries) ‘एंड्रोजेन्स’ या पुरुषी संप्रेरकांची जास्त निर्मिती करण्यास प्रवृत्त करते.
  • अनिमित पाळी व बीजांड न फुटणे : या असंतुलनामुळे बीजांडाची (Egg) योग्य वाढ होत नाही आणि ते वेळेवर बाहेर पडत नाही (Absent Ovulation). यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि गर्भधारणेत अडथळा येतो.
  • आयव्हीएफवर (IVF) परिणाम : लठ्ठपणा नसलेल्या महिलांमध्येही इन्सुलिन रेझिस्टन्समुळे अंड्याची गुणवत्ता खालावते, गर्भ रोपणाचा (Implantation) दर कमी होतो आणि गर्भपाताचा (Miscarriage) धोका वाढतो. आयव्हीएफ उपचारादरम्यानही याचे निदान न झाल्यास यश मिळण्याची शक्यता कमी होते.

पुरुषांच्या जननक्षमतेवर आणि शुक्राणूंवर होणारा दुष्परिणाम

पुरुषांच्या जननक्षमतेवर आणि शुक्राणूंवर होणारा दुष्परिणाम

वंध्यत्वाच्या समस्येकडे सहसा फक्त महिलांचा आजार म्हणून पाहिले जाते, परंतु इन्सुलिन रेझिस्टन्स पुरुषांच्या जननक्षमतेवरही तितकाच गंभीर परिणाम करतो:

  • टेस्टोस्टेरॉनची घट : लठ्ठपणा आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे पुरुषांमधील मुख्य संप्रेरक ‘टेस्टोस्टेरॉन’ (Testosterone) कमी होते आणि ‘इस्ट्रोजेन’ वाढते.
  • शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम : यामुळे शरीरात निर्माण होणारा दाह आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल (Motility) आणि त्यांच्या डीएनएची गुणवत्ता खराब करतो.
  • दोघांची तपासणी आवश्यक : वंध्यत्वाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळपास ५०% प्रकरणांमध्ये पुरुषांमधील दोष किंवा दोघांमधील एकत्रित समस्या कारणीभूत असतात. त्यामुळे केवळ महिलांचीच नव्हे तर पुरुषांचीही मेटाबॉलिक तपासणी होणे तितकेच गरजेचे आहे.

तरुण भारतीयांमध्ये ही समस्या का वाढतेय?

तरुण भारतीयांमध्ये ही समस्या का वाढतेय?

गेल्या दोन दशकांत बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास वेगाने वाढला आहे. जनुकीयदृष्ट्या भारतीय व्यक्ती कमी वजनावरही इन्सुलिन रेझिस्टन्सला अधिक संवेदनशील असतात.
मुख्य कारणे :

  • रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, गोड पेये आणि अति-प्रक्रिया केलेले अन्न.
  • शारीरिक व्यायामाचा अभाव, तासनतास बसून काम करणे आणि अपुरी झोप.
  • शरीराने दिलेल्या या पूर्वसूचनांकडे दुर्लक्ष करू नका
  • पोटाभोवती चरबी वाढणे (Abdominal Obesity) आणि अनपेक्षित वजन वाढणे.
  • जेवण झाल्यानंतर तीव्र थकवा जाणवणे.
  • मान, काख किंवा जांघेत त्वचा काळी पडणे (Acanthosis Nigricans).
  • महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी आणि कुटुंबात टाईप-२ मधुमेहाची पार्श्वभूमी असणे.

जीवनशैलीतील बदल : इन्सुलिन रेझिस्टन्स पूर्ववत करण्याचा मार्ग

जीवनशैलीतील बदल : इन्सुलिन रेझिस्टन्स पूर्ववत करण्याचा मार्ग

आनंदाची गोष्ट म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स वेळीच ओळखला तर तो पूर्णपणे रिव्हर्स करता येतो.

  • ५ ते १०% वजन कमी करा : जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी शरीराचे केवळ ५-१०% वजन कमी केले, तरी इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि महिलांमध्ये बीजांड निर्मिती नैसर्गिकरीत्या सुरू होते.
  • संतुलित आहार : आहारात भरपूर पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, होल ग्रेन्स, लीन प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा. मैदा, साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ पूर्णपणे टाळा.
  • नियमित व्यायाम : कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एकत्र केल्याने स्नायू साखरेचा योग्य वापर करतात आणि इन्सुलिन कार्यक्षमता वाढते.
  • झोप आणि ताणतणाव नियोजन : सततच्या मानसिक ताणामुळे ‘कॉर्टिसोल’ संप्रेरक वाढते, जे इन्सुलिन रेझिस्टन्स आणखी बिघडवते. दररोज ७-८ तासांची शांत झोप आणि योगासने अत्यंत फायदेशीर ठरतात.

वैद्यकीय उपचार आणि दीर्घकालीन आरोग्याचा दृष्टिकोन

वैद्यकीय उपचार आणि दीर्घकालीन आरोग्याचा दृष्टिकोन

केवळ जीवनशैलीतील बदल पुरेसे नसतील, तर एंडोक्रिनोलॉजिस्ट किंवा फर्टिलिटी तज्ज्ञांच्या सल्ल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवणारी औषधे (उदा. मेटफॉर्मिन) सुरू केली जाऊ शकतात. वंध्यत्व ही केवळ मूल होण्यापुरती मर्यादा असलेली समस्या नाही, तर तो तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक आरोग्याचा आरसा आहे. इन्सुलिन रेझिस्टन्सवर वेळीच उपचार केल्याने केवळ गर्भधारणेची शक्यता वाढत नाही, तर भविष्यात होणारा टाईप-२ मधुमेह, हृदयविकार आणि लठ्ठपणाच्या गंभीर धोक्यांपासूनही संरक्षण मिळते.

वंध्यत्वावर मात करण्यासाठी केवळ फर्टिलिटी हॉर्मोन्सवर लक्ष केंद्रित न करता, शरीराच्या चयापचय क्रियेवर (Metabolic Health) लक्ष देणे ही काळाची गरज आहे. ही समस्या स्त्री किंवा पुरुष कोणा एकाची नसून दांपत्याची एकत्रित आरोग्यस्थिती आहे. योग्य वेळी स्क्रीनिंग, सात्त्विक आहार, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्सुलिन रेझिस्टन्सवर मात करून निरोगी गर्भधारणा आणि दीर्घकालीन उत्तम आरोग्य सहज साध्य करता येते.

आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Jul 30, 2026, 04:55 AMMedically Reviewed byDr. Dr Pranav Ghody
  • Jul 30, 2026, 04:55 AMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम